पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण १३ वें. ] नाहीं ' असें जाहीर केलें. वसाहतींतील लोकमत आपल्याविरुद्ध क्षुब्ध झालें आहे हें पाहून इंग्लंडने हा कर परत घेतला; अमेरिकेच्या स्वातं- त्र्याचें युद्ध १७७६--८३. परंतु पार्लमेंटला अशा प्रकारें कर बसवितां येतो हें आपलें म्हणणें जाहीर केलें. इंग्लंडचें अशा प्रका- रच धोरण पाहून वसाहतींनीं बंड उभारलें ( १७७६ ). तेव्हां या बंडखोर वसाहतवाल्यांचा प्रतिकार करण्यासाठीं इंग्लंडकडून सैन्य येत आहे हें पाहतांच अमेरिकेनें फ्रान्सशीं तह करून फ्रान्सचें साहाय्य मिळविलें. पुढें १७८१ मध्ये 'लॉर्ड कार्नवॉलीस ' यास अमेरिकेचा सेनापति जॉर्ज वाशिंगटन याला शरण यावे लागल्यामुळे इंग्लंडला १७८३ मध्यें व्हर्सेल्स या ठिकाणीं तह करावा लागून नाइलाजास्तव अमेरिकेतील वसाहतींच्या स्वातंत्र्यास संमति द्यावी लागली !