पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९१ १३ वें. ] अठराव्या शतकांतील इंग्लंड व फ्रान्स. मध्यें सेनापति वुल्फ याच्या हाताखालील इंग्लिश सैन्यानें अमेरिकेमध्यें असलेलें फ्रान्सचें क्वेबेक हें मजबूत ठिकाण घेऊन सर्व कॅनडा प्रान्तावर इंग्लंडचें वर्चस्व बसविलें. याचप्रमाणें हिंदुस्थानांतही वांदिवाशच्या लढाईत फ्रेंच सैन्याचा पराभव होऊन त्यांची हिंदुस्थानांतील सत्ताही संपुष्टांत आली. फ्रान्सचा अशा रीतीनें समुद्रापलीकडील प्रदेशांत पराभव होत असतां लॅगास व किबेरॉन या ठिकाणीं आरमारी लढायांतही फ्रान्सचा पराभव ( १७५९ ) झाल्यामुळें फान्सची समुद्रावरील सत्ता अजीबात नष्ट घेऊन इंग्लंडचें समुद्रावरील वर्चस्व पूर्णपणें प्रस्था- पित झालें. अशाप्रकारें इंग्लंडचा विजय होत असतां दुसरा जॉर्ज बादशहा मरण पावून तिसरा जॉर्ज इंग्लंडच्या गादीवर आला ( १७६० ). ३ रा जॉर्ज मोठा महत्त्वाकांक्षी असून राज्यकारभार आपल्याच तंत्रानें चालावा असें त्यास वाटत असल्यामुळे, त्यानें पीटसारख्या कर्तृत्ववान् मुख्य प्रधानास राजीनामा द्यावयास लावून, केवळ आपल्याच तंत्रानें चालणाऱ्या लॉर्ड ब्यूट या सरदाराच्या हातीं राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे दिलीं. इकडे पॅरिसचा तह १७६३. सप्तवार्षिक युद्धांत फ्रान्सचा पूर्ण पराभव होऊन पॅरिस शहरीं १७६३ मध्यें तह करण्यांत आला. या तहान्वयें इंग्लंडला फ्रान्सकडून कॅनडा, मिसी- सीपी नदीच्या पूर्वेकडील प्रदेश, फ्रान्सच्या ताब्यांत असलेला हिंदुस्थानां- तील बराच मुलूख मिळाला. अशाप्रकारें ‘ सप्तवार्षिक युद्धामध्यें " इंग्लंडचा जय होऊन, ब्रिटिश साम्राज्याचें क्षेत्र फारच विस्तृत होऊन कांहीं वर्षे झालीं नाहीं तोंच इंग्लंडला अमेरिका खंडांत असलेल्या आपल्या वसाहतींस मुकावें लागलें. १७६५ मध्ये इंग्लंडनें अमेरिकेतील वसाहतींवर 'स्टँप अॅक्ट' नांवाचा कायदा लादला. परंतु अमेरिकेंतील वसाहतवाल्यांनी या वेळीं मोठी चळवळ करून, ' आमचे प्रतिनिधि पार्लमेंट सभेमध्यें नसल्यामुळे आम्ही हा देणार