पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरणं पास जाऊन एकदां कायतो सोक्ष मोक्ष करून घेण्यासाठींच कीं काय 'सप्तवार्षिक युद्ध' सुरूं झालें. हें जगडव्याळ युद्ध सुरू झाल्यावर फ्रान्सची स्थिति फारच चमत्कारिक झाली ! आस्ट्रियास मदत करून प्रशियाशी टक्कर देण्या- साठीं फ्रान्सला -हाइन नदीच्या आसमंतात् असलेल्या प्रदेशांत आपलें. सैन्य पाठवावें लागलें; व त्याचप्रमाणे इकडे समुद्रावर व समुद्रापलीकडे. आपल्या ताब्यांत असलेल्या प्रदेशाचें संरक्षण व्हावें म्हणून इंग्लंडशीं झुंज करण्यासाठीं आपलें आरमार जय्यत तयार ठेवावें लागलें ! अशाप्रकारें समुद्रावर व त्याचप्रमाणे जमिनीवर फ्रान्सला एकसमयावच्छेदें करून आपलें लक्ष ठेवावें लागल्यामुळें फ्रान्सची स्थिति फारच चमत्कारिक झाली ! अशाप्रकारें फान्सवर बिकट प्रसंग आला असतां फ्रान्सचा राजा १५वा लुई अगदीच नेभळा असून खुषमस्कऱ्या लोकांच्याच तंत्रानें राज्यकारभार करीत असल्यामुळे तर फ्रान्सची स्थिति अधिकच खाला-- वत चालली ! फ्रान्समध्ये अशा प्रकारें अनास्था असतां इंग्लंडची स्थिति मात्र फारच समाधानकारक होती. पिटसारख्या कर्तृत्ववान् व उत्साही प्रधानाच्या हातीं राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे असल्यामुळें, या युद्धामध्यें इंग्लंडचा जय होणार हैं निश्चितच होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं ! पिटनें इंग्लंडचें आरमार व लष्कर जय्यत तयार ठेवून हिंदुस्थान व अमेरिका या देशांत असलेली फ्रेंच ठाणीं हस्तगत करण्यासाठी इंग्लंडचें आरमार व लष्कर रवाना केलें. इंकडे फेडरीकनें १७५७ मध्यें रॉसबॅक या ठिकाणी फ्रेंच सैन्याचा पराभव केला होता; व त्यानंतर फर्डिनंड ऑफ बर्न्सविक याच्या हाताखालील इंग्लिश सप्तवार्षिक युद्ध १७५६-१७६३. सैन्यानें व्हाइन नदीच्या आसपास फ्रेंच सैन्याचां धुव्वा उडविला असल्यामुळे फ्रान्सची युरोपमधील स्थिति फारच चमत्का- रिक झाली ! युरोपमध्यें फ्रेंच सैन्याचा असा पराभव होत असतां १७५९