पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ वें. ] अठराव्या शतकातील इंग्लंड व फ्रान्स. १८९ कारभाराचीं सर्व सूत्रे १४ व्या लुईचा पुतण्या ऑर्लेन्सचा फिलीप यानें आपल्या हातांत घेतलीं. फिलीप हा व्यसनी व ऐषआरामांत दिवस काढणारा असल्यामुळे याच्यापासून फ्रान्सला मुळींच फायदा न होतां, फ्रान्सची स्थिति खालावत चालली. परंतु १७२३ मध्ये हा मरण पावल्या- वर, अल्पवयी राजाच्या वतीनें, राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे प्रधान- मंडळानें आपल्या हातांत घेतलीं. १५ व्या लुईच्या अमदानींत फ्रान्सला १७३३ च्या सुमारास युरोपमध्ये ' पोलंडच्या गादीवर कोणीं वारस यावें' यासंबंधी उपस्थित झालेल्या युद्धाची संधि साधून आस्ट्रियाकडून लॉरेन हा प्रांत बळकावतां आला ! हा प्रांत फ्रान्सनें आपल्या राष्ट्रांत सामील करून घेतल्यावर फ्रान्सला आपली पूर्व सरहद्द वाढवतां येऊन, मेट, टूल, व्हर्जून या आपल्या ताब्यांत असलेल्या प्रदेशांस बळकटी आणतां आली. यानंतर आस्ट्रियाच्या गादीवर कोणीं यावें ' यासंबंधीं उपस्थित झालेल्या युद्धांत फ्रान्सनें भाग घेतला होता, परंतु त्यापासून फ्रान्सला कांहींच फलनिष्पत्ति झाली नाहीं. 6 अठराव्या शतकांतील मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंड व फ्रान्स यांच्यामधील समुद्रावर व समुद्रापलीकडे असलेल्या प्रदेशावर कोणाचें वर्चस्व असावें यासंबंधीं उपस्थित झालेली स्पर्धा ही होय ! अशा प्रकारें या दोन राष्ट्रांमध्ये चढाओढ चालली असतां, युरोपमध्यें प्रशिया व आस्ट्रिया या दोन राष्ट्रांमध्यें जर्मनीमध्ये कोणाचें वर्चस्व असावें यासंबंधीं तशीच चढाओढ सुरू होती ! अशा प्रकारें या दोन राष्ट्रांमध्ये स्पर्धा सुरू असतां, १७५६ च्या सुमा- रास आस्ट्रियाचा मुख्य प्रधान कान्झ यानें फ्रान्स व आस्ट्रिया या दोन राष्ट्रांमध्यें तह घडवून आणल्यामुळें अर्थातच इंग्लंडला प्रशियाचा पक्ष स्वीकारावा लागला ! शेवटीं युरोपमधील प्रमुख राष्ट्रांतील ही स्पधा विको- इंग्लंड व फ्रान्स यांच्यामधील स्पर्धा.