पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण जाहीर करणें भाग पडलें. परंतु या युद्धापासून कांहींच फलनिष्पत्ति झाली नाहीं. यानंतर बादशहा ६ वा चार्लस मरण पावल्यामुळे 'आस्ट्रि- याच्या गादीवर कोणी यावें' यासंबंधीं युरोपमध्यें युद्ध उपस्थित झालें असून इंग्लंडने फ्रान्स व प्रशिया यांच्याविरुद्ध आस्ट्रियाचा पक्ष स्वीका- रिला. वॉलपोलचें धोरण शांततेचें असल्यामुळे त्यास युद्धप्रसंगी नीट कामगिरी बजावितां यावयाची नाहीं असें इंग्लिश जनतेस वाटून त्यास १७४२ मध्ये राजीनामा देणें भाग पडलें. अशा प्रकारें या युरोपियन युद्धांत इंग्लंडने भाग घेतला होता, तरी १७४८ मध्यें एक्स-ला-शापेल येथें — एकमेकांनीं एकमेकांचा घेतलेला प्रदेश परत द्यावा ' या अटीवर तह करण्यांत आल्यामुळे इंग्लंडला कांहींच मिळालें नाहीं. मध्यंतरीं १७४५ मध्ये २ या जेम्सचा नातू चार्लस एडवर्ड यानें इंग्लंडचें राज्यपद हस्तगत करण्याच्या इराद्यानें प्रयत्न केला होता. १७४५ च्या जुलै महिन्यांत आपल्या थोड्या अनुयायांसह तो पहिल्यानें स्कॉट- लंडमध्ये उतरला. तेथील ' हायलंडर्स ' लोकांची सहानुभूति मिळवून त्यानें त्यांच्या साहाय्यानें एडिंबरो शहर हस्तगत केलें. यानंतर लंडन शहर काबीज करण्याच्या इराद्यानें तो डर्बीपर्यंत चालून आला; परंतु १७४६ मध्यें कलोडेन मूर या ठिकाणीं मोठ्या निकराची लढाई होऊन इंग्लिश सैन्यानें ' हायलंडर्स' सैन्याचा पराभव केल्यामुळे त्यास परत फिरणें भाग पडून मोठ्या प्रयासानें युरोपमध्ये पळ काढावा लागला. इकडे फ्रान्सच्या इतिहासाकडे लक्ष दिल्यास 'स्पेनच्या गादीवर कोणीं यावें ' यासंबंधीं उपस्थित झालेल्या युद्धांत फ्रान्सचा पराभव झाल्यामुळें, १७१३ पासून फ्रान्सच्या उत्कर्षास उतरती कळाच लागली ! युट्रेक्टचा तह होऊन दोन वर्षे झालीं नाहींत तोंच फ्रान्सचा महत्त्वाकांक्षी बादशहा १४ वा लुई मरण पावून, त्याच्यानंतर फ्रान्सच्या गादीवर त्याचा पांच वर्षांचा पणतू १५ वा लुई आल्यामुळे, राजा वयांत येईपर्यंत राज्य-