पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ वें. । अठराव्या शतकांतील इंग्लंड व फ्रान्स. १८७ त्यास दिली. १६८८ सालीं झालेल्या राज्यक्रांतीनें सर्व सत्ता राजाच्या हातांतून पार्लमेंटच्या हातांत गेली होती, तरी तिसरा वुइल्यम हा कर्तृ- तत्त्ववान् राज्यकारभारदक्ष असल्यामुळें त्याच्या अमदानीत हा -बदल विशेष व्यक्त झाला नव्हता; परंतु जॉर्जचें लक्ष जर्मनीं- मधील आपल्या हॅनोव्हर संस्थानाकडेच अधिक असून इंग्लिश भाषा अवगत नसल्यानें राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे आपल्या प्रधानमंडळाच्या हातांत द्यावीं लागून त्यांच्याच तंत्रानें राज्यकारभार करावा लागल्यामुळे याच्या अमदानीत प्रधानांचे प्रस्थ बरेंच माजूं लागलें. याखेरीज दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ३ या वुइल्यमनें पार्लमेंट नेहमीं आपल्या प्रधानांच्या हुकमतीखालीं रहावें म्हणून पार्लमेंटसमेंतील प्रमुख -माणसांस प्रधानमंडळाची जागा देण्याचा प्रघात पाडला होता; तो आतां बहुतेक रूढ होऊन, पार्लमेंटमधील प्रबळ पक्षास आपलें राजावर वर्चस्व बसविणें शक्य झालें. याखेरीज राज्यकारभाराच्या सर्व खर्चासाठीं एक वर्षाचीच रक्कम मंजूर करण्याचा प्रघात रूढ झाल्यामुळे दरवर्षी पार्लमेंटसभेची बैठक बोलाविली नाहीं तर राज्यकारभाराचा सर्वच गाडा बंद ठेवल्याप्रमाणे होत असल्यामुळे राजास दरवर्षी पार्लमेंटची बैठक - बोलाविणे भाग पडूं लागलें. या वेळीं विग पक्षांतील प्रमुख गृहस्थ वॉलपोल याची मुख्य प्रधा- नाच्या जागेवर नेमणूक झाली असून (१७२१-४२ ) त्यानें आपल्या कारकीर्दीत इंग्लंडची औद्योगिक व व्यापारविषयक बाबींमध्यें उन्नति होण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मध्यंतरीं पहिला जॉर्ज राजा मरण पावून ( १७२७ ) त्याचा पुत्र २ रा जॉर्ज हा जरी इंग्लंडच्या गादीवर आला होता, तरी त्याचें धोरण शांततेचेंच असल्यामुळे इंग्लंडला इत- वॉलपोल १७२१-४२. क्यांतच कोणत्याही युद्धांत पडावें लागलें नाहीं. परंतु स्पेनकडून स्पॅनिश वसाहतींकडे जाणाऱ्या इंग्लिश मालावर निष्कारण अडचणी उपस्थित करण्यांत येत असल्यामुळे स्पेनविरुद्ध इंग्लिश लोकमत क्षुब्ध होऊन वॉल- पोलला १७३९ मध्ये स्पेनशीं, आपल्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध युद्ध