पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ लें. ] विषय-प्रवेश. १७ इंग्लंड, फ्रान्स, स्पेन वगैरे राष्ट्रांचें एकीकरण होऊन तीं राष्ट्रें जशीं संघटित झाली होतीं, तसेंच जर्मनीचेंही एक बलाढ्य संघटित राष्ट्र बन- वावें, व त्यासाठी जर्मनीमध्ये मोडणाऱ्या शेंकडों लहान लहान संस्थानांचे अधिकार मर्यादित करावेत, या हेतूनें १ ल्या मॅग्झिमीलननें पुष्कळ प्रयत्न केले, परंतु जर्मनीमधील संस्थानिकांना एकमेकांविष पांचवा चार्लस पवित्र रोमन साम्राज्याचा बादशहा होतो. असलेल्या स्पर्धेमुळें जर्मनीचें एकीकरण होऊं शकलें नाहीं. अशा रीतीनें माझमीलनचे सर्व प्रयत्न जरी निष्फळ ठरले तरी त्याच्या कारकीर्दीत दोन महत्त्वाच्या गोष्टी घडून येऊन त्यायोगें युरोपमध्यें ख्रिश्चन राष्ट्रांच वर्चस्व कायम राहिलें व त्या सर्व राष्ट्रांत आस्ट्रियाचें संस्थान फारच प्रबळ झालें. १४५३ मध्यें पूर्वरोमन बादशाहीचें केंद्रस्थान जें कॉन्स्टांटिनोपल शहर, तें उध्वस्त करून टाकणाऱ्या आटोमन टर्क्सच्या पश्चिमयुरोपकडे वृद्धिंगत होणाऱ्या सत्तेस मॉग्झमीलननें अडथळा आणून युरोपची आटोमन टर्क्सपासून सुटकाच केली असें म्हणावयास पाहिजे. युरोपमध्यें विश्वन राष्ट्रांचें वर्चस्व राखण्याचे कामी त्यास यश आलें व त्यानंतर या सर्व युरोपियन राष्ट्रांमध्यें आस्ट्रियावर राज्य करणारें हॅप्सबर्ग घराणेंच प्रबळ होण्यास, वः या घराण्याच्या अमलांत असलेला प्रदेश अवा-- ढव्य रीतीनें वाढण्यास कांहीं गोष्टी घडून आल्या. १४७७ मध्यें फ्रान्स व जर्मनी यांच्या सरहद्दीवर असलेला बर्गडीचा संस्थानिक चार्लस बोल्ड याच्या एकुलत्या एका मुलीशीं मॅग्झिमीलनचें लग्न होऊन चार्लसच्या मृत्यूनंतर बर्गडीच्या संस्थानिकाच्या ताब्यांत असलेला नेदर्लंड प्रांत मॅग्झिमीलनच्या ताब्यांत आला. यानंतर त्याचा मुलगा फर्डीनेंड याचें स्पेनच्या राजाच्या जोन मुलीशीं लग्न होऊन स्पेनचें राज्य व स्पेनच्या ताब्यांत असलेला विस्तृत मुलूख मॅग्झिमीलनचा नातू चार्लस यास मिळाल्यामुळे हॅप्सबर्ग घराण्याची युरोप खंडांतील बऱ्याच मुलखावर हुकमत चालूं लागली. इ. स. १५१९ मध्यें मॅग्झिमीलनचा नातु चार्लस याची रोमन बादशहाच्या पदावर निवडणूक झाली. अशा रीतीनें आस्ट्रियावर