पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण राज्य करणाऱ्या हॅप्सबर्ग घराण्याच्या ताब्यांत युरोपमधील बर्गेडीचें संस्थान, नेदर्लंड प्रांत, स्पेनचें राज्य व वसाहती वगैरे बराच मुलूख मिळून हें घराणें फारच बलाढ्य झालें होतें. इटली. अर्वाचीनयुगाच्या सुरवातीस जर्मनीप्रमाणें इटलीचें देखील एक सं- घटित राष्ट्र बनलें नसून इटालियन द्वीपकल्पामध्यें मीलनचें राज्य, व्हेनीसचें लोकसत्ताक राज्य, फ्लॉरेन्सचें लोकसत्ताक राज्य, पोपच्या हाताखालील संस्थान व नेपल्सचें राज्य अशीं पांच संस्थानें अस्तित्वांत होती. परंतु मध्ययुगाच्या शेवटी शेवटीं इटलीमधील वर्चस्वासंबंधानें या पांच स्वतंत्र संस्थानांच्या आपापसांत झटापटी सुरू असल्यानें इटलीचें एकीकरण होण्याचें -तर बाजूलाच राहिलें, पण या अंतस्थ कलहाचा फायदा घेऊन इटलीजवळ असलेल्या फ्रान्स व स्पेन या संघटित राष्ट्रांना इटलीमधील संस्थानांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करतां येणें शक्य झालें. स्पेननें तर पंधराव्या शतकाच्या शेवटीं सार्डीनिया, सिसली व नेपल्स या इटालियन संस्थानांवर आपलें पूर्ण वर्चस्व बसविलें. परंतु स्पेनचें इटलीमधील वाढत चाललेलें प्रस्थ पाहून फ्रान्सला सहाजिकच स्पेनचा हेवा वाटू लागला; व स्पेनचें वर्चस्व कमी करुन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराद्यानें फ्रान्सचा राजा ८ वा चार्लस यानें १४९४ मध्ये इटलीवर स्वारी केली ! अशाप्रकारें इटलीमध्यें राष्ट्रीय ऐक्य नसल्यामुळे मध्ययुगामध्यें इटलीची भूमि म्हणजे पर- कीय राष्ट्रांची महत्त्वाकांक्षा सफल करून घेण्याची युद्धभूमीच बनून राहिली ! इटालियन द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील भागांत असलेल्या नेपल्स या संस्थानावरील वर्चस्वासंबंधानें फ्रान्स व स्पेन या दोन राष्ट्रांमध्ये स्पर्धा उत्पन्न झाली, व बिचाऱ्या नेपल्सवर मात्र अरिष्ट ओढवलें ! १५०४ मध्यें स्पेननें हें संस्थान फ्रान्स- नेपल्सचें संस्थान. कडून आपल्या ताब्यांत घेतलें, व तेव्हांपासून सरासरी दोनशें वर्षे म्हणजे युट्रेक्टचा तह होईपर्यंत ( १७१३ ) स्पेनचेंच या संस्थानावर वर्चस्व कायम होतें.