पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. प्रकरण वर्चस्व स्थापतां येऊन पूर्वकालीं वैभवाच्या अत्युच्च शिखराप्रत चढलेल्या रोमन साम्राज्याचें केंद्रस्थान जें रोम शहर, त्या ठिकाणीं ख्रिश्चन धर्माचे मुख्य धर्मगुरु समजल्या जाणाऱ्या पोपनें राज्याभिषेक केल्यामुळे रोमन साम्राज्य व त्यास ख्रिश्चन धर्माचें पाठबळ असे दोन दुवे एकत्र सांधले गेले. फ्रँकलोकांचा राजा चार्लस यास रोमन बादशहा अशी बहुमानाची पदवी मिळाली व त्याच्या अंमलाखाली असलेल्या अवाढव्य प्रदेशास पवित्र रोमन साम्राज्य असें समजण्यांत येऊं लागलें. अशाप्रकारें इ. स. ८०० पासून पूर्वयुरोपकडील कांहीं थोडा प्रदेश खेरीजकरून सर्व युरोपभर आपली सत्ता गाजविणारें पवित्र रोमन साम्राज्य अर्वाचीनयुगाच्या सुरुवातीस अगदींच विस्खळित झालें होतें; व जर्मनीमध्ये मोडणाऱ्या संस्थानांखेरीज इतरत्र या पवित्र रोमन बादशाहीची सत्ता कोणीच जुमा- नीत नसे, इतकेंच नव्हे तर जर्मनीमध्ये मोडणाऱ्या संस्थानांवरही ही सत्ता आतां केवळ दिखाऊच राहिली होती असें म्हटलें पाहिजे ! पवित्र रोमन साम्राज्याचा राज्यकारभार चालविण्यासाठीं एक कायदे करणारें मंडळ नेमण्याचा प्रघात पूर्वापार असून तेथें जर्मनीमध्ये मोडणाऱ्या शेंकडों लहानमोठ्या संस्थानांतून प्रतिनिधी येत ! जर्मनीमधील कांहीं प्रमुख संस्थानांना व शहरांना पवित्र रोमन साम्राज्याचें बादशाही पद कोणास द्यावें हें ठरविण्याचा अधिकार असे. अशा प्रकारें हैं बादशाही पद वंश- परंपरा चालत नसून त्याबद्दलची निवडणूक करण्याचा पूर्वापार प्रघात असला तरी पंधराव्या शतकामध्यें जर्मनीमध्ये मोडणाऱ्या आस्ट्रिया संस्थाना- वर राज्य करणारे हॅप्सवर्ग घराणें फारच बलाढ्य होऊन या घराण्यां- तील पुरुषांचीच बहुधा रोमन साम्राज्याच्या बादशाही पदावर नेमणूक होऊं लागली; ती इतकी कीं पवित्र रोमन साम्राज्याचें बादशाही पद या घराण्याचे मालकीचेंच आहे असें वाटूं लागलें ! अर्वाचीन युगाच्या सुरु- वातीस हॅप्सवर्ग घराण्यांतील १ला मॅग्झिमीलन ( १४९३ - १५१९ ) या पवित्र रोमन साम्राज्याच्या बादशाही पदावर अधिष्ठित होता.