पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरणं करून तह घडवून आणण्याचा त्यानीं विचार केला. या वेळी दोन्हीही पक्ष युद्धास कंटाळले असल्यामुळे १७१३ मध्ये युट्रेक्ट या ठिकाणी तह करण्यांत आला. या तहान्वयें इंग्लंडला फ्रान्सकडून न्यू फाऊंडलंड, नोव्हा स्कोशिया, हडसन आखातानजीकचा मुलूख व स्पेनकडून जिब्राल्टर व मिनो ही ठिकाणें मिळाल्यानें इंग्लंडचें समुद्रावरील वर्चस्व प्रस्थापित होण्यास मदतच झाली. ॲनच्या कारकीर्दीत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट घडून आली व ती गोष्ट म्हणजे इंग्लिश व स्कॉटिश पार्लमेंटचें एकीकरण ही होय. पहिल्या प्रथम कांहीं व्यापारविषयक बाबींसंबंधानें या दोन देशांमध्यें खटका उडण्याचा रंग दिसूं लागला. शेवटीं स्कॉटलंडच्या गादीवर "हॅनोव्हर घराण्याऐवजी दुसरे एखादें घराणें आणूं' अशी स्कॉटिश लोकांनीं धमकी दिल्यामुळे स्कॉटलंड व इंग्लंड या दोन्ही देशांतील पार्लमेंट सभांचें एकीकरण झाल्याखेरीज या दोन्ही देशांना एकमेकांविषयीं सहानुभूति वाटावयाची नाहीं असें वाटल्यामुळे १७०७ मध्ये या दोन्ही राष्ट्रांचें एक संयुक्त पार्लमेंट स्थापन करण्यांत आलें. १७१४ मध्ये ॲन राणी मरण पावली तेव्हां तिच्यानंतर इंग्लंड- च्या कायद्यान्वयें हॅनोव्हर घराण्यांतील सोफिया हिला इंग्लंडचें राज्यपद मिळावयाचें होतें; परंतु ती १७१३ मध्येंच मरण पावली असल्यानें तिचा पुत्र जॉर्ज यास इंग्लंडच्या गादीवर बसविण्यांत आलें. जॉर्ज- ला गादीवर येऊन एक वर्ष होतें तोंच दुसरा जेम्स राजाचा पुत्र, यानें स्वतःस '३ रा जेम्स' असे जाहीर करून इंग्लंडचें राज्यपद घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास इंग्लिश जनतेचें पाठबळ नसल्यानें त्याचा हा प्रयत्न सिद्धीस गेला नाहीं ! पहिला जॉर्ज. ( १७१४ - १७२७.) जॉर्जनें गादीवर येतांच 'टोरी' पक्षाच्या प्रधानांस राजीनामा व्यावयास लावून'बिग' पक्षाच्या प्रधानमंडळाच्या हातीं राज्यकारभाराचीं सूत्र