पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ वें. ] अठराव्या शतकांतील इंग्लंड व फ्रान्स. १८५ देण्यांत आल्या. अशाप्रकारें १६९० नंतर बिचाऱ्या आयरिश लोकांस आपल्या स्वतःच्या देशांतील सर्व जमिनींस मुकावें लागून इंग्लिश जमीन- दारांच्या शेतांत सामान्य मजुराप्रमाणें काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणें भाग पडूं लागलें ! बॉयनेच्या लढाईत पराभूत होऊन पळून गेलेल्या २ या जेम्सला फ्रान्सचा राजा १४वा लुई यानें आश्रय दिला असल्यामुळे इंग्लंडला अर्थातच फ्रान्सच्या विरुद्ध आपलें धोरण जाहीर करावें लागलें. या सुमारास १४व्या लुईची राक्षसी महत्त्वाकांक्षा थोपवून धरण्यासाठीं, बादशहा, हॉलंड व स्पेन यानी ऑग्जबर्ग या ठिकाणी स्थापन केलेल्या संघास जाऊन मिळण्याचें इंग्लंडने ठरविलें. इंग्लंडचा राजा ३रा वुइल्यम यानें अशारीतीनें इंग्लंडचें धोरण आंखून १६८९-१६९७ पर्यंत फ्रान्सचे इतर युरोपियन राष्ट्रांबरोबर युद्ध सुरू होतें त्या वेळीं फ्रान्सविरुद्ध शस्त्र उपसले. यानंतर ' स्पेनच्या गादीवर कोणीं यावें ' यासंबंधीं उपस्थित होणाऱ्या युद्धांत: वुइल्यमनें लुईच्या विरुद्ध असलेल्या पक्षास सामील होऊन फ्रान्सविरुद्ध तयारी चालविली होती, परंतु मध्यंतरीं ( १७०२ ) वुइल्यम मृत्यु पावल्यामुळें, त्याच्यानंतर गादीवर येणाऱ्या ॲन राणीस हें युद्ध पुढें चालविणें भाग पडलें. लुईविरुद्ध स्थापन झालेल्या संघांत भाग घेऊन इंग्लिश सेनापति मार्लबरो यानें. ब्लेनहिम व मॉलपोक्क या लढायांत अद्वितीय परा- क्रम गाजवून फ्रान्सचा पुरता फडशा पाडण्याचा घाट घातला होता, तरी याबद्दल इंग्लंडमधील टोरी पक्षास मुळींच उत्साह वाटला नाहीं ! या युद्धाच्या पायीं राष्ट्रांत सर्वत्र महागाई होऊन राष्ट्रीय कर्ज एकसारखें वाढत चालल्यामुळें, तह होऊन युद्ध केव्हां एकदांचें थांबतें असें त्यांस होऊन गेलें होतें; व सरते शेवटीं विग प्रधानमंडळाचा पाडाव होऊन, राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे जेव्हां टोरी प्रधानमंडळाकडे आली तेव्हां कसेंही १२