पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ वें. ] सप्तवार्षिक युद्ध १७५६-१७६३. प्रशियाचा उदय व उत्कर्ष. १७९ स्वीडन, सॅक्सनी वगैरे राष्ट्रांशी तह करून त्यांचें साहाय्य घेतलें अस- ल्यामुळे फ्रेडरीकची स्थिति फारच चमत्कारिक झालेली होती; व या सुमारास मेरिया थेरिसेचा पति १ ला फॅन्सीस याच्या प्रेरेणेनें जर्मन संस्थानांनी मेरिया थेरिसलाच मदत करण्याचें ठरविल्यामुळे तर प्रशियाची आतां धड- गत लागणार नाहीं असें वाटू लागलें. परंतु अशा बिकट परिस्थितींतही फेडरीकनें धैर्य सोडलें नाहीं. आपल्या सर्व शत्रूंचीं सैन्यें एकत्र होण्यापूर्वीच त्यांच्यावर आपण हल्ला केला तरच आपला निभाव लागण्याचा संभव आहे असें वाटून, त्यानें पहिल्याप्रथम सॅक्सनी प्रांत काबीज करून बोहेमिया संस्थानावर हल्ला केला. यानंतर पुढच्याच वर्षी बोहेमियाची राजधानी प्रेग शहर काबीज करण्याचा त्यानें घाट घातला होता, परंतु त्याच्या सैन्याच्या दुसऱ्या एका तुकडीचा कोलीन या ठिकाणी १८ जून १७५७ मध्ये पराभव झाला असल्यामुळे त्यास पुनः सॅक्सनी प्रांतांत परतावें लागलें ! अशारीतीनें फेडरीकच्या सैन्यानें माघार घेत- लेली पाहून आस्ट्रियन सैन्यास मोठा हुरूप आला व तें सॅयलेशिया प्रांतांत शिरलें. इकडे रशियन सैन्य पूर्वप्रशियांत येऊन दाखल झालें होतें; व स्वीडिश सैन्यानें पोमेरॉनया प्रांतांत आपला तळ दिला होता व बादशाही व फ्रेंच सैन्य तर थेट बर्लिन शहरावर चालून येण्याच्या बेतांत होतें ! अशाप्रकारें प्रशियावर चोहोंकडून परचक्र आल्या- मुळे प्रशियाची सत्ता आतां रसातळास जाणार असें सर्वांस वाटूं लागलें. परंतु अशा बिकट परिस्थितीतही फेडरीकनें आपलें धैर्य मुळींच सोडलें नाहीं. आतां जीवावर उदार होऊन शत्रूशीं टक्कर दिल्याखेरीज गत्यंतर नाहीं हें त्यास कळून चुकलें ! १७५७ च्या नोव्हेंबर महिन्यांत त्यानें आपल्या २२ हजार सैन्यानिशीं आपल्यापेक्षां संख्येनें दुप्पट असलेल्या बादशाही व फ्रेंच सैन्यावर तुटून पडून त्याचा पुरता फडशा पाडला. फ्रेंच व बादशाही सैन्याचा पुरता मोड केल्यावर एका महि- न्याच्या आतच फेडरीकनें सॅयलेशिया प्रांतात शिरलेल्या आस्ट्रियन