पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण गोष्टी या बाबींमध्येंही त्याजकडून उत्तेजन मिळत गेलें. वरील गोष्टींमध्यें फ्रान्स राष्ट्र अग्रेसर असल्यामुळे फ्रान्सबद्दल त्यास आदर वाटे ! फ्रान्सचें या बाबतींत अनुकरण करण्याच्या उद्देशानें फ्रेंच तत्त्ववेत्ते, कवि व लेखक यांस त्याच्याकडून उत्तेजन मिळत असे. १७५० पासून तीन वर्षे फ्रान्स- मधील प्रख्यात तत्त्ववेत्ता व्हॉलटेर यास त्यानें आश्रय दिला होता. आपल्या अंतस्थ बाबीसंबंधानें महत्त्वाच्या सुधारणा करीत असतां, आपणाकडून सॅयलेशिया प्रांत परत मिळविण्याबद्दल मेरिया थेरिसेकडून प्रयत्न होणार हें तो जाणून होता. मेरिया थेरिसेचे याच दिशेनें प्रयत्न सुरू असून फेडरीकचा सूड घेण्यासाठी तिनें व तिचा मुख्य प्रधान कानिट्झ यांनी आज शेंकडों वर्षे एकमेकांची हाडवैरी असलेल्या आस्ट्रियाचें हॅप्सवर्ग घराणें व फ्रान्सचें बोरबोन घराणें यांच्यामध्यें खरोखरीच स्नेह- संबंध घडून आणला ! अशाप्रकारें अकल्पित रीतीनें आस्ट्रिया व फ्रान्स या राष्ट्रांमध्यें तह घडवून आणल्यामुळे, युरोपमधील इतर प्रमुख राष्ट्रांच्या परराष्ट्रीय धोरणांतही महत्त्वाची क्रान्ति झाली ! आस्ट्रिया व फ्रान्स या दोन बलाढ्य राष्ट्रांशीं तोंड देण्यास आपण एकटे अगदींच असमर्थ आहोंत हैं ओळखून, दुसऱ्या कोणत्या तरी प्रमुख युरोपियन राष्ट्रांशीं स्नेह करणें फेडरीकला अत्यावश्यक वाटूं लागलें ! यावेळी इंग्लंड व फ्रान्स या दोन राष्ट्रांमध्यें समुद्रावरील वर्चस्वासंबंधानें स्पर्धा सुरू होती तेव्हां इंग्लंड, फ्रान्सविरुद्ध आपणास मदत करील असें वाटून १७५६ च्या जानेवारी महिन्यांत फेडरीकनें इंग्लंडशी तह केला. अशाप्रकारें समुद्रा- वरील वर्चस्वासंबंधानें इंग्लंड व फ्रान्स, व जर्मनीमधील वर्चस्वासंबंधानें. आस्ट्रिया व प्रशिया या दोन राष्ट्रांमध्यें जी चुरस उत्पन्न झाली होती, त्याचें शेवटीं 'सप्त वार्षिक' युद्धांमध्यें पर्यवसान होऊन हीं राष्ट्रें एकमेकांशी झुंजूं लागलीं ( १७५६-६३ ). अशाप्रकारें फेडरीक व मेरिया थेरिसा यांच्यामध्यें युद्ध उपस्थित झाल्यावर ( १७५६ ) मेरिया थेरिसा हिनें रशिया,