पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण सैन्यावर हल्ला करून बेसलूजवळ त्याचा पुरता मोड केला व त्यास परत आपल्या मुलखांत हांकून लावलें. फेडरीकचा हा पराक्रम पाहून स्वीडिश व रशियन सैन्यास या वेळीं प्रशियावर चालून जाण्याचे धाडस झालें नाहीं. अशारीतीने अवघ्या चार महिन्यांच्या आंत आपणावर चोहोंकडून चालून येणाऱ्या शत्रूंचा प्रतिकार करून फ्रेडरीकनें त्यांस थोपवून धरलें ! यानंतर इंग्लंडकडून कुमक मिळाल्यावर फेडरीकची स्थिति फार समाधानकारक झाली व शत्रूच्या मुलखावर चालून जाण्याचीही त्यांस उमेद वाटू लागली. फर्डिनंड ऑफ बर्न्सविक या सरदाराच्या हाताखालीं असलेल्या इंग्लिश सैन्यानें हाईन नदीच्या आसपास फ्रेंच सैन्याशी झुंज करून त्यास गुंतवून ठेवल्यामुळे, फेडरीकला आपलें सर्व लक्ष आस्ट्रिया व रशिया या दोन राष्ट्रांकडे खर्च करण्यास अवसर सांपडला ! अशा प्रकारें या वर्षी प्रशियाची परिस्थिति, गेल्या वर्षीच्या मानानें बरीच समाधान- कारक झालेली होती, तरी रशिया व आस्ट्रिया यांचें सैन्य संख्येच्या मानानें प्रशियापेक्षां अधिक असल्यामुळें हीं दोन्हीं सैन्यें एकत्र होण्यापूर्वीच त्यांच्यावर वरचेवर हल्ला करण्याचा फ्रेडरिकनें निश्चय केला; व लागलीच १७५८ मध्ये झोर्नडॉर्फ या ठिकाणीं त्यानें रशियन सैन्यावर जय मिळविला. परंतु पुढच्याच वर्षी रशियन सैन्यानें उचल खाऊन त्याचा कुर्नर्सडॉर्फ या ठिकाणीं पुरता पराभव केल्यानें तर युद्धाचें सर्वच पारडें फिरल्याचें दिसूं लागलें; परंतु फ्रेडरीकनें धीर न सोडतां आपलें सैन्य पुनः जमा करून शत्रूशीं तोंड देण्याची तयारी केली. यानंतर फ्रेडरीकला पूर्वीप्रमाणें जय मिळत गेले नाहींत, तरी मोठ्या धैर्यानें व चिकाटीनें शत्रूस आपल्या मुलखांत येऊंन देण्याची त्यानें पराकाष्ठा केल्या- मुळें एक दोन वर्षे सर्व कांहीं सुरळीत चाललें होतें; परंतु १७६१ मध्ये इंग्लंडच्या गादीवर नुकत्याच आलेल्या तिसऱ्या जॉर्ज बादशहानें फ्रेड- रिकला दर वर्षीप्रमाणें कुमक देण्याचें नाकारल्यामुळे तर आपले सैन्य