पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ वें. ] प्रशियाचा उदय व उत्कर्ष. १७५ आला) यानें आपल्या बापाच्या कठोर व त्रासदायक स्वभावास कंटाळून पळून जाण्याचा बेत केला. परंतु राजपुत्राचा हा बेत समजतांच त्यास आपल्या मुलाचा अतोनात राग येऊन राजपुत्र फ्रेडरीक याचा वध फ्रेडरीक वुइल्य मचा स्वभाव. करावा असें देखील त्यास वाटूं लागलें ! परंतु राजपुत्राच्या सुदैवानें राजाचे मन अशा प्रका- रच्या भयंकर कृत्यापासून वळविण्यांत आल्यावर राजानें, आपल्या मुलास शिक्षा म्हणून लष्करी व मुलकी खात्याच्या खालच्या हुद्यापासून सर्व प्रकारचें शिक्षण संपादन करणें त्यास भाग पाडलें. राजपुत्र फेडरीक यास अशाप्रकारें सामान्य माणसाप्रमाणें आपण प्रत्येक गोष्टींत राबावें हें अर्थातच आवडत नव्हतें; परंतु बापाच्या भीतीनें त्यास हें काम करावें लागलें ! परंतु अशारीतीनें राज्यकारभाराच्या प्रत्येक खात्याची त्यास प्रत्यक्ष माहिती मिळाल्यामुळे एकंदरीत त्याचा फायदाच झाला असें म्हटलें पाहिजे. १७४० मध्ये बापाच्या मृत्यूनंतर २ रा फेडरीक प्रशियाच्या गादीवर आला. लहानपणापासून त्याचें, वाङ्मय व कलाकौशल्याच्या गोष्टी यांकडेच लक्ष असल्यामुळे याच्या अमदानींत या गोष्टींस बरेंच उत्तेजन मिळेल असें वाटत होतें. गादीवर आल्यावर आपलें राष्ट्र वृद्धिंगत करण्या साठीं त्यास एक चांगलीशी संधि सांपडली. फ्रेडरीक गादीवर येऊन फार दिवस झाले नाहींत तोंच रोमन साम्राज्याचा बादशहा ६ वा चार्लस मरण पावून त्याच्य फ्रेडरीक भी ग्रेट. मृत्यूनंतर हॅप्सबर्ग घराण्याचा पुरुषवंश संपुष्टांत आला. आपल्यानंतर आपल्या साम्राज्याचें कोणीं वारस व्हावें या- संबंधीं वाटाघाट होईल हें ओळखून त्यानें आपल्या मरणापूर्वी आपली मुलगी मेरिया थेरिसा हिला आपल्या साम्राज्याची एकटीच वारस करून त्याबद्दल सर्व युरोपियन राष्ट्रांची संमति मिळविली होती. तेव्हां ६ व्या चार्लसच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी मेरिया थेरिसा हिनें हॅप्सबर्ग घराण्याच्या ताब्यांत असलेल्या सर्व प्रदेशावर आपणच वारस असल्याचे जाहीर केलें.