पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण परंतु यावेळीं फेडरीक बुइल्यमला आपला मुलूख विस्तृत करण्यास ती उत्तम संधि आहे असें वाटून, (६ व्या चार्लसनंतर मेरिया थेरिसा हिनेंच रोमन साम्राज्याचें वारस व्हावें अशी फेडरीक वुइल्यमनें कबुल दिली होती तरी) त्यानें एकदम आपल्या कवाईत शिकवून तयार ठेवलेल्या सैन्यानिशीं १७४० च्या डिसेंबर महिन्यांत आस्ट्रियाच्या ताब्यांत असलेल्या सॅयलेशिया प्रांतावर हल्ला केला. दक्षिणेकडून फ्रेंच सैन्यही आस्ट्रियावर चालून येत असल्यामळे तर मेरिया थेरिसेची स्थिति फारच चमत्कारिक झाली ! प्रशियाचा राजा फ्रेडरीक यानें १० एप्रिल १७४१ मध्यें मोलविटा या ठिकाणीं आस्ट्रियन सैन्याचा पराभव करून सॅयलेशिया प्रांत बळकाविला. प्रशियाचा हा पराक्रम पाहून इतर युरोपियन राष्ट्रांसही उत्तेजन आलें, व हलके हलके से व्हाय, बव्हेरिया, सॅक्सनी हीं बारकीं राष्ट्रं देखील, आस्ट्रिया संस्थानाच्या ताब्यांत अस- लेल्या कांहीं प्रदेशावर आपला हक्क आहे असें दाखवून एकदम आस्ट्रियावर चालून आली. अशारीतीनें ६ वा चार्लस मरण पावून २ वर्षे झालीं नाहींत तोंच आस्ट्रियाच्या सर्व शत्रूंनीं उचल करून आस्ट्रियाचें संस्थान नामशेष करण्याचा प्रयत्न चालविला ! परंतु मेरिया थेरिसा ही कर्तृत्ववान् व धूर्त होती. तिनें तशा परि- स्थितीतही आपल्या राष्ट्राचें संरक्षण करण्यासाठीं चिकाटीने प्रयत्न केले. आपल्या राष्ट्राचें संरक्षण करणें आपलें कर्तव्य आहे, व या कामी आपल्या प्राणाचीही पर्वा कोणी बाळगू नये असें तिनें आपल्या सैनिकांस उत्तेजन दिलें होतें ! तिच्या प्रोत्साहनानें आस्ट्रियन सैन्यास जोर आला व शत्रूंवर तुटून पडून, त्यानीं त्यांस बोहेमिया प्रांतांतून हांकून लावलें; व बव्हेरिया प्रांतावरही स्वारी केली. फ्रेंच सैन्याचा असा पराभव होत आहे हैं पहातांच फ्रेडरीकनें बोहेमिया प्रांतावर स्वारी करून आस्ट्रियन सैन्याचा पराभव केला (१७४२ ). तेव्हां आतां फेडरीकशीं तह केल्या- खेरीज आपणास फ्रेंच सैन्याचा व इतर युरोपियन राष्ट्रांचा फडशा पाडत यावयाचा नाहीं हें ओळखून तिनें १७४२ मध्ये ब्रेस्लू येथें तह करून