पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण झाला कीं होहेनझोलर्न घराण्याच्या ताब्यांत असलेल्या सर्व प्रदेशास ' प्रशिया ' अशी संज्ञा मिळू लागली ! फ्रेडरीकनंतर गादीवर येणारा त्याचा पुत्र फ्रेडरीक १ ला वुइल्यम ( १७१३ -४०) आपल्या आजाप्रमाणेच महत्त्वाकांक्षी होता. आपलें सैन्य जय्यत तयार ठेवल्याखेरीज आपणास आपलें राष्ट्र बलाढ्य करितां यावयाचें नाहीं हें पाहून त्यानें आपलें सर्व लक्ष या बाबींत खर्च केलें, व थोडक्याच काळांत उत्कृष्टप्रतीचें लष्करी शिक्षण देऊन ८० हजार फौज तयार ठेवली. यानंतर त्यानें राज्यकारभारासंबंधीं कांहीं सुधारणा करून प्रशियामध्यें एकतंत्री केंद्रीभूत झालेली राज्यपद्धति स्थापन करून आपल्या खास हुकमतीखालीं वागणारी नोकरशाही निर्माण केली ! अशाप्रकारें आपल्या राष्ट्राच्या अंतस्थ बाबीसंबंधानें महत्त्वाच्या सुधारणा केल्यावर त्यास आपलें राष्ट्र बलाढ्य करितां येऊन परराष्ट्रीय राजकारणांत हात घालतां आला. यावेळीं रशिया, डेन्मार्क व पोलंड या राष्ट्रांनी वारंवार हल्ला केल्यामुळे स्वीडनचें राज्य अगदींच कमकुवत झा होतें व आपण यावेळीं स्वीडनवर हल्ला केला तर आपला फायदा करून तां येईल असे वाटून वुइल्यमनें एकदम स्वीडिश मुलखांवर हल्ला करून पोमेरेनिया प्रांत बळकाविला. यानंतर स्वीडनचा पराक्रमी राजा १२ वा चार्लस मरण पावल्यावर स्वीडनला तह करणें भाग पडून बाल्टिक समुद्रा. वरील स्टेटिन नांवाचें बंदरही प्रशियाच्या हवालीं करावें लागलें (१७२०)- अशाप्रकारें प्रशियाचें राष्ट्र बलाढ्य होऊन त्यास युरोपियन राष्ट्रांमध्यें बरेंच वरचें स्थान पटकावितां आलें याचें बरेच श्रेय फेडरीक वुइल्यमला दिले पाहिजे ! फेडरीक वुइल्यमच्या स्वभावाचें पृथक्करण केल्यास तो फारच कठोर- हृदयी असल्याचें आपणास वाटेल ! आपल्या मनाविरुद्ध वागणान्या मनुष्यास वाटेल ती शिक्षा करण्यास देखील तो मागें पुढे पहात नसे ! एकदां तर त्याचा मुलगा फ्रेडरीक ( हाच पुढें फेडरीक धी ग्रेट म्हणून प्रसिद्धीस