पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ वें. ] प्रशियाचा उदय व उत्कष १७३ स्वीडनचें वर्चस्व अजीबात नष्ट करण्यास त्यास फार परिश्रम पडले नाहींत. परंतु अशाप्रकारें सहजरीत्या आपल्या ताब्यांत आलेला पोमेरॅनियाचा विस्तृत प्रांत फ्रेडरीकला आपल्या वर्चस्वाखालीं ठेवतां येणें शक्य नव्हतें ! १४ व्या लुईची हॉलंडवरील मोहिम संपून १६७९ मध्यें निमवेजेन या ठिकाणी तह झाल्यावर सेंट जर्मेन या ठिकाणीं फेडरीकला तह करणें भाग पडून पोमेनिया प्रांत स्वीडनच्या ताब्यांत देणे भाग पडलें. • ब्रेनडेनबर्गचे संस्थानी- 'कास' प्रशियाचा राजा' हा किताब मिळतो. आपल्या अमदानीत ब्रेन्डेनबर्ग या संस्थानास उन्नत स्वरूप प्राप्त करून दिल्यावर फ्रेडरीक वुइल्यम १६८८ मध्ये मरण पावला. त्याच्या- नंतर गादीवर येणारा त्याचा पुत्र फेडरीक हा चैनी व ऐषआरामी असल्यामुळे याच्या अमदानीत मॅन्डेनबर्गचें वर्चस्व कायम टिकतें कीं नाहीं याची शंका होती. परंतु ही शंका खोटी ठरून याच्या अमदानींत त्या संस्थानाचें पूर्वीचें वर्चस्व कायम टिकलें इतकेंच नव्हे, तर याच्या अमदानींत ब्रॅन्डेनबर्गच्या संस्थानिकास ‘प्रशियाचा राजा ' असा किताब मिळाल्यामुळे तर ब्रॅन्डेनबर्गच्या संस्थानिकाचा दर्जी फारच वाढला. यावेळीं ' स्पेनच्या गादीवर कोणीं यावें ' यासंबंधीं उपास्थत होणाऱ्या युद्धांत बादशहा लिओपोल्ड यास फेडरीकची मंदत 'पाहिजे होती, तेव्हां त्यास खुष करण्यासाठी ' प्रशियाचा राजा ' असा किताब बहाल करण्यांत आला ! फ्रेडरीकनें लागलीच पूर्वप्रशियाची राजधानी कॉनिग्जबर्ग येथे १८ जानेवारी १७०१ मध्ये स्वतःस राज्या- भिषेक करून घेतला ! प्रशियाचा प्रांत 'पवित्र रोमन साम्राज्यांत' कधींच मोडत नसल्यामुळे फ्रेडरीकला ' प्रशियाचा राजा' असा किताब दिल्यानें जर्मनीचा बादशहा म्हणून आपले महत्त्व कमी होईल अशी लिओपोल्डला भीति वाटत नव्हती ! परंतु इतः पर ब्रॅन्डेनबर्गचे संस्थानिक स्वतःस 'प्रशियाचे राजे' असे म्हणूं लागले, व हलके हलके त्यांचा हा प्रघात इतका रूढ