पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण अ वाटून त्यानें या सर्व प्रदेशाचें एक संघटित राष्ट्र स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले. आपलें हें ध्येय साध्य करण्यासाठीं त्यानें या तीन निर- निराळ्या प्रदेशांतील प्रतिनिधिमंडळें नाहींशीं करून आपली सत्ता अनियंत्रित केली व आपल्या हुकमतीखालील सर्व सैन्याचें एकीकरण केलें ! अशा रीतीनें सर्व प्रदेशाचें एकीकरण होऊन प्रशियाचें एक संघ- टित राष्ट्र बनल्यावर, परराष्ट्रीय राजकारणांत हात घालून आपलें महत्त्व वाढवावें असें फेडरीकला वाटू लागल्यास कांहींच नवल नव्हतें ! परंतु आपलें सैन्य वाढवून त्यांना उत्कृष्ट प्रतीचें लष्करी शिक्षण दिल्याखेरीज आपणास आपली महत्त्वाकांक्षा साध्य करून घेतां यावयाची नाहीं असें वाटून त्याचे तत्प्रीत्यर्थ प्रयत्न सुरू झाले. आतां योग्य संधि सांपडतांच फेडरीक आपली महत्त्वाकांक्षा सफल करण्याचा प्रयत्न करणार ही स्पष्ट दिसत होतें. १६५५ मध्ये युद्ध उपस्थित झालें आहे हें पाहतांच त्यास अत्यानंद झाला व या संधीचा फायदा घेऊन पूर्व प्रशियाच्या मुलखा- वर पोलंडचा पूर्वापार असलेला सार्वभौमत्वाचा हक्क पोलंडकडून काढून घेण्यास त्यास फार श्रम पडले नाहींत ! फ्रेडरीक वुइल्यमचें परराष्ट्रीय धोरण. यानंतर १६७२ मध्यें परराष्ट्रीय राजकारणांत हात घालण्याची त्यास संधि सांपडली. या सुमारास १४ व्या लुईनें हॉलंडवर स्वारी केली आहे हें पाहतांच त्यानें बादशहाचें साहाय्य घेऊन, डच लोकांचें संरक्षण करण्यासाठी एकदम फ्रेंच सैन्यावर चाल केली. परंतु १४ व्या लुईनें फेडरी- कला शह देण्यासाठी ब्रॅन्डेनबर्ग संस्थानावर हल्ला करण्यासाठीं स्वीडिश - राजाचें मन वळविलें. आपल्या संस्थानावर स्वीडनकडून हल्ला होत आहे हें पाहतांच तो तांतडीने परत फिरला व १६७५ च्या जून महिन्यांत फेहर्बेलिन या ठिकाणीं स्वीडिश सैन्यावर एकदम तुटून पडून त्यानें स्वीडनचा पुरता फडशा पाडला ! अशाप्रकारें आपल्या सैन्याचें लष्करी श्रेष्ठत्व एकदां प्रस्थापित केल्यावर पोमेरॅनिया प्रांतावरील