पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ वें. ] प्रशियाचा उदय व उत्कर्ष. १७१ त्या वेळीं तेथील लोकांनीं प्रॉटेस्टंटपथाचा स्वीकार केला, व होहेनझोलर्न घराण्यांतील आलबर्ट नांवाच्या पुरुषास आपला राजा केलें (१५२५). अशा- रीतीनें जवळ जवळ शंभर वर्षेपर्यंत आलबर्टच्या वंशानें येथें राज्य केल्या- वर १६१८ मध्यें आलबर्टचा वंश संपुष्टांत आला व ब्रॅन्डेनबर्ग संस्थाना- वर राज्य करणाऱ्या होहेनझोलर्न घराण्यांतील पुरुषास आलबर्ट- च्या घराण्याशीं नात्याचा संबंध असल्यानें, प्रशियाचें संस्थान अचानक मिळालें. फेडरीक वुइल्यम १६४०-८८. अशाप्रकारें ब्रॅन्डेनबर्ग संस्थानिकास जर्मनीच्या पूर्वेकडील प्रशि- याचें राज्य मिळालें होतें तरी १६४० मध्यें फेडरीक वुइल्यम नांवाचा पुरुष ब्रॅन्डेनबर्गच्या गादीवर येण्यापूर्वी तें संस्थान फारसें प्रसिद्धीस आलें नाहीं. फेडरीक वुइल्यम गादीवर आता त्यावेळी जर्मनीमध्यें तीस वर्षे टिकलेलें धर्मयुद्ध सुरू असल्यामुळे ब्रॅन्डेनबर्ग संस्थानाची फारच दुर्दशा होण्याचा संभव होता; परंतु त्यानें आपल्या कर्तबगारीनें राज्यांत स्वस्थता राखून १६४८ मध्यें वेस्टफॅलियाच्या तहानें जेव्हां तें युद्ध थांबविण्यांत आलें, त्यावेळीं पोमेरॅनिया प्रांताचा पूर्वभाग व दुसरीं बरींच धर्माधिकाऱ्यांच्या ताब्यांत असलेली ठिकाणें मिळविलीं. यावेळीं पोमेरॅनिया प्रांताचा सर्वच भाग त्यास मिळण्याचा संभव होता, परंतु स्वीडनसारख्या बलाढ्य राष्ट्राचा त्या प्रांताकडे डोळा असल्यामुळे, त्यास त्या प्रांताच्या पूर्वभागावरच संतुष्ट राहवें लागलें. अशाप्रकारें फेडरीक गादीवर आल्यावर त्याच्या ताब्यांत पश्चिमे- कडील व्लीव्ह प्रदेश, मध्यवर्ती बॅन्डेनबर्ग संस्थान व पूर्वेकडील प्रशि- याचें राज्य असे तीन एकमेकांपासून अलग असलेले प्रदेश असून त्या प्रत्येक संस्थानाची राज्यव्यवस्था, तेथील सैन्य व प्रतिनिधिमंडळें निर- निराळीं होतीं. आपल्या ताब्यांत असलेल्या निरनिराळ्या प्रदशांतील अलगपणा नाहींसा केल्याखेरीज आपलें राष्ट्र बलाढ्य व्हावयाचें नाहीं