पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण कारभारांत हात घालून आपला फायदा करून घेण्यात चांगलेच फावे ! पोलंडची अशा प्रकारची स्थिति असल्यामुळें राशिया, प्रशिया व आस्ट्रिया या तीन बलाढ्य राष्ट्रांतील कॅथराईन, फेडरीक व मेरिया थेरेसा या राज्यक- यस बिचाऱ्या पोलिश राष्ट्राचे तुकडे गिळंकृत करण्याची संधि मिळाली.. १७७२ मध्यें कॅथराईननें पोलंडवर मोठा जय मिळवून पोलंडचा बराच मोठा भाग आपल्या वंशांत टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु कॅथरा- ईनची ही कृति प्रशियाचा राजा फ्रेडरीक डोळ्यांत तेल घालून पहात असल्यामुळें, कॅथराईनला या दरोडेखोरीच्या लटींतील कांहीं भाग प्रशिया व आस्ट्रिया या दोन राष्ट्रांसही वांटून द्यावा लागला. या विभागणीनें १७७२ मध्ये रशियास पोलंडचा डिना हा प्रांत, आस्ट्रियाला गॅलिशिया हा प्रांत व प्रशियाला पोलंडचा पश्चिमेकडील कांहीं भाग मिळाला. या-- नंतर १७९३ व १७९५ मध्ये या तीन राष्ट्रांनी पोलंडचे आणखी लचके तोडून पोलंडचा पूर्ण पराभव केला व पोलिश राष्ट्राचें अस्तित्वच नाहींसें करून टाकलें ( १७९५ ). अशारीतीनें पोलंडचें स्वातंत्र्य जरी या तीन राष्ट्रांस हिरावून घेतां आलें तरी त्या राष्ट्राचा स्वाभिमान कांहीं त्यांस नष्ट करतां आला नाहीं ! आपले आचारविचार, आपला राष्ट्रीयपणा पोलिश लोकांनीं अजून सोडला नसून पुनः संधि सांपडल्यास आपल्या पुरातन राष्ट्राचें पुनरुज्जीवन करण्याची त्यांस आशा. वाटत आहे ! ८८/७५ पोलिश राष्ट्र इति- हासांतून नामशेष होतें - १७९५. उत्तर युरोपप्रमाणे दक्षिण युरोपमध्येही आपल्या महत्त्वाकांक्षेस वा मिळावा व आपल्या मार्गांत असलेल्या टर्कीचा अडथळा दूर करावा या हेतूनें कॅथराईननें ( १७६८ - १७७४ व १७८७ - १७९२ ) या वेळीं दोनदां टर्कीशीं युद्ध उपस्थित करून काळ्या समुद्राच्या आसपासचा मुलूख मिळविला ! परंतु एवढ्यानेंच रशियाची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाहीं. तर भूमध्य समुद्रावरील कॉन्स्टॅटिनोपल हैं इतिहासप्रसिद्ध