पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वें . ] रशियाचा अरुणोदय. १६७ भाराची सर्व सूत्रे आपल्या हातांत घेतलीं ! अशाप्रकारें अन्यायानें व क्रूरमार्गानें जरी तिनें राज्यपद मिळविलें होतें, तरी गादीवर आल्यावर तिनें आपल्या मुत्सद्देगिरीनें व कर्तबगारीनें राशयास युरो- पियन राष्ट्रांमध्ये पहिल्या प्रतीच्या स्थानाप्रत आणून सोडलें यांत संशय नाहीं. कॅथराईनचा जन्म जर्मनीसारख्या सुधारलेल्या देशांत झाला असल्यामुळें, तिला सुधारणेची खरी किंमत कळत होती, व तिनें पीटर- प्रमाणे रशियामध्ये सर्व प्रकारची सुधारणा घडवून आणली. हिच्या अमदानीत ठिकठिकाणीं विद्यापीठे स्थापन करण्यांत येऊन व्यापार व उद्योगधंदे यांचा रशियामध्यें उत्कर्ष होत गेला. अशाप्रकारें रशियाची अंतः स्थिति सुधारण्याकडे तिनें लक्ष घातलें इतकेंच नव्हे तर पीटरच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणें पश्चिम युरोपमध्येही आपलें वर्चस्व वाढविण्याचा तिच्या- कडून प्रयत्न करण्यांत आला. उत्तरयुरोपमध्यें पीटरनें स्वीडनच्या सत्तेचा -हास केल्यापासून रशियाच्या महत्त्वाकांक्षेच्या आड पोलंडचें राष्ट्र व दक्षिण युरोपमध्यें टर्कीींचें राष्ट्र हींच कायतीं दोन राष्ट्रें होतीं ! तेव्हां उत्तर व दक्षिण युरोपमध्ये रशियाच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणाऱ्या या दोन राष्ट्रांचा नाश करावा व रशियाची सत्ता वाढवावी असें तिला वाटूं लागलें; व हाच उद्दिष्ट हेतु साध्य करण्यासाठीं तिनें आपल्या दीर्घ प्रयत्नाने पोलंडचे एकसारखे लचके तोडण्यास प्रारंभ केला. पोलंडमधील बेबंद- शाही. या वेळीं पोलंडमध्यें बेबंदशाही माजली असून सर्व सत्ता सरदार लोकांच्या हातीं गेलेली होती, ती इतकी कीं पोलंडच्या त्या वेळच्या कायद्याप्रमाणें राज्यकारभार चालविणें कोणत्याही राजास अशक्य झालें असतें ! कायदे कौन्सिल- मधील कोणत्याही अमीरउमरावास आपल्या एकट्या विरुद्ध मताने राज्यकारभाराचा सर्वच गाडा बंद पाडतां येई ! तेथील राज्यव्यवस्था अशा प्रकारची चमत्कारिक असल्यामुळे राष्ट्रांतील अंतस्थ कलह अधिकच तीव्रतर होऊन परकीय राष्ट्रांस पोलंडच्या राज्य-