पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वं. ] रशियाचा अरुणोदय. १६९ आरमारी ठिकाण मिळविणें हेंच रशियाचें अंतिमसाध्य असे, परंतु ही महत्त्वाकांक्षा कॅथराईनच्या हयातींत पूर्ण झाली नाहीं. तिच्यानंतर गादीवर येणाऱ्या बादशहानी देखील दक्षिणेकडे भूमध्यसमुद्रावरील कॉन्स्टैंटीनोपल शहर मिळविणें हेंच आपलें ध्येय ठेवून कित्येक शतकें हैं आरमारी ठिकाण घेण्याचा प्रयत्न चालविला ! परंतु रशियाच्या ताब्यांत तें ठिकाण गेल्यास इतर प्रबळ युरोपियन राष्ट्रांच्या हितसंबंधास जबरदस्त धोका येण्याचा संभव असल्यामुळे मोठमोठ्या युरोपियन राष्ट्रांनीं मध्यें पडून रशियाची ही महत्त्वाकांक्षा सफल होऊं दिली नाहीं ! आजपर्यंत ११