पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण कल्पना देखील त्यास कशीशीच वाटू लागली. आपल्या मुलाचें मन वळ- "विण्याचा पीटरने पुष्कळ प्रयत्न केला, परंतु त्यास या कामीं यश आलें नाहीं. रशियाच्या उत्कर्षसाधनाच्या मार्गांत एवढीच अडचण आहे असें वाटून 'पीटरनें अलेक्सिसवर राजद्रोहाचा आरोप शाबीत करवून त्याचा शिरच्छेद · करविला ( १७१८ ) ! रशियाच्या उन्नतीप्रीत्यर्थ अशाप्रकारचे प्रयत्न करून पीटर १७२५ 'मध्ये मरण पावला. पीटरनंतर त्याची पत्नी १ ली कॅथराईन हिनें १७२७ 'पर्यंत राज्य करून आस्ट्रियाशीं सख्य संपादन केलें. तिच्यानंतर २ रा पीटर गादीवर आला ( १७२७ - १७३० ). या दोन राज्यकर्त्यांच्या अमदानींत रशियामध्यें जुन्या मतांचा पगडा बसून पीटरच्या सर्व सुधा- रणा नामशेष करण्याचा प्रयत्न करण्यांत आला. परंतु रशियाच्या सुदै- चानें १७३० नंतर ॲना इव्हानोव्हना ( १७३० ते १७४० ) व इलि- झाबेद ( १७४१-१७६२) या दोन राज्यकर्त्यांनीं पीटरचें अनुकरण • करून त्याच्या अमदानींतील सर्व सुधारणा कायम ठेवून त्याची महत्त्वा- - कांक्षा सफल करण्याचे प्रयत्न केल्यामुळे रशियास युरोपियन राष्ट्रांमध्ये मान्यता मिळाली. १७३३ ते १७३५ पर्यंत पोलंडच्या अंतस्थ कलहा- मध्यें तिनें भाग घेतला; व आस्ट्रियाच्या गादीवर कोणीं यावें यासंबंधीं उपस्थित झालेल्या कलहामध्यें (१७४०-१७४८) तिनें इंग्लंड व हॉलंड या राष्ट्रांशी सख्य संपादन केलें. सप्तवार्षिक युद्धांत (१७५६-१७६३) - इलिझाबेदनें प्रशियाचा राजा फ्रेडरीक धी ग्रेट याच्याशी सामना · देण्यासाठीं कंबर बांधली. अशारीतीनें रशियाची युरोपमधील प्रमुख • राष्ट्रांमध्यें गणना होत असतां दुसऱ्या कॅथराईनच्या अमदानीत तर ( १७६२ - १७९६ ) रशियानें युरोपमध्यें बरेंच वरचें स्थान पटका- वलें. २ री कॅथराईन ही जर्मनीमधील एका संस्था- निकाची मुलगी होती व रशियाचा राजपुत्र ३ रा पीटर याच्याशीं तिचें लग्न झालें होतें. ३ रा पीटर अगदीं नेभळा व अर्धवट असल्यामुळे कॅथराईननें २ ऱ्या कॅथराईनच्या अमदानीतील रशि- याचा उत्कर्ष... • आपल्या मर्जीतील दोन पुरुषांकडून त्याचा वध करविला; व राज्यकार-