पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वें. ] रशियाचा अरुणोदय. १६३ लागला ! त्यानंतर चार्लसला पोलंडकडे वळतां आलें व तेथें देखील त्यास पोलिश सैन्याचा पराभव करतां आला. अशा रीतीनें १२ व्या चार्लसनें आपल्या शत्रूवर जय मिळविला होता; तरी एवढ्यानेंच संतुष्ट न रहातां आपल्या विरुद्ध स्थापन झालेल्या कटाचा मुख्य प्रवर्तक पोलंडचा राजा आगस्टस आहे तेव्हां त्याचा पुरता नाश केल्याखेरीज आपण परत फिरावयाचें नाहीं असा त्याचा निर्धार झाल्यामुळे सर्वच पारडें फिरलें. पोलंडमध्यें यावेळीं अंदाधुंदी माजलेली होती ! सरदार लोकांनी आपल्या हातांत सर्व सत्ता बळकावली असून ते आपापल्या जहागिरीवर स्वतंत्र राजाप्रमाणेंच वावरत असत ! पोलंड हैं एक संघटित राष्ट्र आहे. असें नुसतें नांवाला दाखविण्यासाठींच कीं काय तेथें एक प्रतिनिधि सभा असून ह्या सभेतर्फेच राजाची निवडणूक होई; परंतु राजाच्या हातीं कोण- त्याच प्रकारची सत्ता नसल्यामुळे त्यास आपल्या अधिकारानें कांहींच करतां येणें शक्य नव्हतें. पोलंडमध्यें अशाप्रकारची अंदाधुंदी असतांना १६९७ मध्ये तेथील लोकांनी सॅक्सनीचा संस्थानिक अगस्टस यास आपला राजा निवडलें होतें. परंतु पोलिश पार्लमेंटच्या संमतीशिवायः आगस्टसनें आपल्या एकट्याच्याच अधिकारानें चार्लसविरुद्ध युद्ध जाहीर कैल्यामुळें, चार्लसकडून आगस्टसचा पराभव झाला त्यावेळी पोलिश लोकांना वाईट वाटण्याचें बाजुला राहून उलट आनंदच झाला होता ! परंतु चार्लसनें आगस्टसला पोलंडच्या राज्यपदावरून पदच्यूत करून आपल्या एका हस्तकास पोलंडच्या गादीवर बसविलेलें पाहून पोलिश लोकांस चीड आली व ते चार्लसविरुद्ध उठले ! अशा रीतीनें स्वीडन व पोलंड यांच्यामध्यें वैमनस्य सुरू असतां रशियाच्या पीटर बादशहानें नाव्ही येथें झालेल्या पराभवाचा पुरा सूड घेण्याची जारीनें खटपट चालविली होती ! त्यानें आपल्या सैन्याची