पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ स्वीडनचें वैभव. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण - नद्यांच्या मुखावरील प्रदेश स्वीडनला मिळाला. अशाप्रकारें स्वीडनचें वर्चस्व उत्तरयुरोपमध्यें प्रस्थापित झालें होतें तरी हैं वर्चस्व, स्वीडिश लोकांच्या कर्तबगारीवर, त्यांच्या ज्ञानावर अवलंबून नसून त्यांनीं आपल्या लष्करी शिस्तीनें व हडेल-- हप्पीनें मिळविलें असल्यामुळें तें फार दिवस टिकणें शक्य नव्हतें ! सत- राव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वीडनच्या शेजारी असलेल्या राष्ट्रां स्वीडनचा उत्कर्ष पाहवला नाहीं व त्यांनीं स्वीडनचें वैभव नष्ट करण्याचा बेत केला. पश्चिमेकडे डेन्मार्कचा मुलूख, पूर्वेकडे रशिया, पोलंड वगैरे राष्ट्रांचा थोडा फार मुलूख काबीज करून स्वीडननें आपले वर्चस्व स्थापन केलें होतें, तेव्हां योग्य संधि सांपडतांच या राष्ट्रांनीं स्वीडनवर हल्ला करण्याचा बेत करावा यांत कांहींच नवल नव्हतें. १६९७ सालीं स्वीडन- च्या गादीवर १२ वा चार्लस आला तेव्हां स्वीडनच्या शत्रूंस योग्य सांपडली ! स्वीडनचा राजा अल्पवयी असल्यामुळे आपणास आपला मुलूख परत मिळवितां येईल असें वाटून डेन्मार्क, रशिया व पोलंड याः राष्ट्रांनी आपसांत तह केला (१७०० ). परंतु या राष्ट्राचा अंदाज पार चुकला; कारण चार्लस जरी केवळ : पंधरा वर्षांचा होता, तरी तो धाडसी व शूर असल्यामुळें त्यानें आपल्या शत्रुंचे सर्वच बेत फसविले. डेन्मार्क, पोलंड व रशिया या तीन राष्ट्रांचीं ' सैन्य एक ठिकाणी नसल्यामुळें, आपण एकदम चाल केल्यास, आपणाला तिन्ही सैन्यांचा वेगवेगळ्या ठिकाणीं पराभव करतां येईल असें चार्लसला वाटूं लागलें; व त्यानें एकदम चाल करून १७०० मध्ये कोपेनहेगेन या ठिकाणी डेन्मार्कच्या राजास तह करणें भाग पाडलें. डेन्मार्कच्या राजाशीं तह झाला नाहीं तोंच चार्लसनें आपला मोर्चा दुसरीकडे वळविला. त्यानें रशियाचा बादशहा पीटर यास फिन्लंडच्या आखातानजीक नाही या स्वीडनचा जय. ठिकाणीं गांठलें. पीटरच्या हाताखालीं पन्नास- हजार सैन्य होतें तरी देखील चार्लसच्या कवा-- इती सैन्यापुढें पीटरच्या सैन्याचें कांहींच चालेना, व थोडक्याच वेळांत त्याचा पुरा मोड होऊन रशियन सैन्यास पळ काढावा