पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण नीट जमवाजमव करून त्यास उत्तम तऱ्हेचें लष्करी शिक्षण दिलें असल्या- मुळे त्यास या सैन्याच्या साहाय्यानें बाल्टिक समुद्राच्या लगतचा बराच मुलखही काबीज करता आला ! १७०३ मध्ये या नवीन जिंकलेल्या मुल- खांतच त्यानें सेंटपीटर्सवर्ग नांवाचें शहर वसविलें. १२ व्या चार्लसनें पोलंडचा राजा आगस्टस याला तह करणें भाग पाडून रशियाचा मोड करण्यासाठी रशियाची राजधानी मास्को याकडे आपला मोर्चा वळविला ( १७०८ ); परंतु त्यावेळीं भर हिंवाळा असल्या- • मुळे त्याच्या सैन्याचे वाटेंत बरेच हाल झाले. सरतेशेवटीं १७०९ मध्यें "पल्टाव्हानजीक राशियन सैन्याची गांठ पडून मोठी लढाई झाली. यावेळीं स्वीडिश सैन्यानें नेहमीप्रमाणें शौर्याची पराकाष्ठा केली तरी रशियन सैन्यापुढे त्यांना टिकाव धरवला नाहीं. स्वीडिश सैन्याचा मुरा मोड होऊन चार्लसला आपल्या थोड्या • रशियाचें वर्चस्व • वाढतें - १७०९. अनुयायांसह टर्कीकडे पळ काढावा लागला. राश- -यानें स्वीडिश सैन्याचा पूर्णपणें पराभव केल्यामुळे स्वीडनचें राष्ट्र अगदीं खालच्या दर्जाप्रत जाऊन पोहोंचलें, व इतःपर उत्तर युरोपमध्यें स्वीडनच्या ऐवजी रशियाचें वर्चस्व प्रस्थापित झालें असें म्हणण्यास हरकत नाहीं ! टर्कीमध्ये असतांना बाराव्या चार्लसने टर्क लोकांना आपल्या • बाजूनें रशियाशीं युद्ध करण्याविषयीं वळविण्याचा प्रयत्न केला • होता तरी त्यापासून फारशी फलनिष्पत्ति झाली नाहीं. १७९४ मध्यें - चार्लस परत स्वीडनमध्यें आला त्यावेळीं स्वीडिश राष्ट्राचा पुरता नाश होऊन - स्वीडनच्या शेजारी असलेल्या शत्रुराष्ट्रांनीं स्वीडनचे लचके तोडून बराच “प्रदेश आपल्या घशांत टाकला होता ! अशाप्रकारें आपल्या राष्ट्राचें पूर्व- वैभव पार नष्ट झालेलें पाहून तें पुनः प्राप्त करून घेण्यासाठीं चार्लसनें १७१८ च्या सुमारास आपणाकडून होईल तितकी तयारी केली; परंतु