पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वें. ] रशियाचा अरुणोदय. ९६१ 'क्रांति होत आहे हें पहातांच जुन्या पद्धतीचे अभिमानी असलेल्या धर्मा- `धिकाऱ्यांस त्याच्याबद्दल तिटकारा वाहूं लागून त्याच्या सर्व सुधारणांस अर्थातच विरोध होऊं लागला ! तेव्हां या धर्माधिकाऱ्यांची सत्ता कमी करून आपले इष्ट हेतु साध्य करण्याच्या मार्गातील ही अडचण दूर करावी असें वाटून इ. स. १७०० मध्यें ग्रीक ख्रिश्चन धर्माचा मुख्य धर्मा- धिकारी मरण पावल्यावर पीटरने त्याच्या जागी दुसऱ्या कोणासही न नेमतां, धार्मिक बाबीची व्यवस्था करण्यासाठी आपल्या खास हुकमतीखालीं असलेलें एक मंडळ नेमून आपली सत्ता पूर्णपणें अनियंत्रित केली ! पीटरने आपल्या राज्यांत ठिकठिकाणी रस्ते बांधले व कालवे खोदले. राष्ट्रांतील उद्योगधंद्यास त्याच्याकडून उत्तेजन मिळून ठिकठिकाण शाळा स्थापन करण्यांत आल्या. अशाप्रकारें सार्वजनिक उपयोगाचीं कृत्यें केल्यावर परकीय शत्रूपासून रशियाचें संरक्षण व्हावें व रशियाचें वैभव सर्व युरोप खंडभर प्रस्थापित करतां यावें या हेतूनें रशियाचें लष्कर व आरमार जय्यत तयार ठेवण्याविषयीं त्यानें प्रयत्न चालविले ! आपल्या देशामध्यें अशाप्रकारच्या सुधारणा केल्यावर साहजिकच पीटरचें लक्ष परकीय राजकारणांत जाऊं लागलें. रशियाच्या उत्तरेस असलेल्या बाल्टिक समुद्रावर आपले वर्चस्व स्थापन करावयाचें तर स्वीडन-' सारख्या बलाढ्य राष्ट्राशीं टक्कर देणें भाग होतें ! यावेळीं उत्तरयुरोपवर स्वीडनचें बरेंच वर्चस्व माजलें असून याचे सर्व श्रेय स्वीडनचा पराक्रमी राजा गस्टाव्हस अडोल्फस ( १६११- १६३२ ) यांसच दिलें पाहिजे. गस्टाव्हस हा महापराक्रमी, कर्तृत्ववान् व महत्त्वाकांक्षी असल्यामुळे त्यानें बाल्टिक समुद्राच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील भागामध्यें स्वीडनचें वर्चस्व स्थापले असून, जर्मनीमध्यें चाल- लेल्या धर्मयुद्धामध्यें भाग घेतल्यामुळे १६४८ मध्ये झालेल्या वेस्ट- फॅलियाच्या तहाच्या वेळीं पोमेरॅनिआ हा प्रांत, व बेसर व एल्ब या दोन