पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६०. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण साली त्यानें काळ्या समुद्रावरील अझोव बंदर काबीज केलें. अशाप्रकारें दक्षिणेकडे राशियाची सत्ता समुद्रापर्यंत भिडविल्यावर पाश्चात्य संस्कृति व पाश्चात्य आचारविचार यांचा आपल्या देशांतील लोकांस फायदा करून देण्याचा त्यानें निश्चय केला; व त्यासाठीं पाश्चात्य सुधारणा व संस्कृति यांचें प्रत्यक्ष अवलोकन करण्यासाठीं युरोपमध्यें प्रवास करण्याचें त्यानें ठरविलें. पीटरने १६९७ व १६९८ हीं दोन वर्षे जर्मनी, हॉलंड व इंग्लंड या देशांत प्रवास करून पाश्चात्य संस्कृति व पाश्चात्य उद्योगधंदे यांची प्रत्यक्ष माहिती करून घेण्यामध्ये घालविली. हॉलंडमध्यें प्रवास करीत असतांना पटिरनें एका जहाजें बांधण्याच्या कारखान्यांत स्वतः सुताराचें देखील काम केलें. त्यानें ठिकठिकाणीं वैद्यकशास्त्रावरील व्याख्यानें ऐकलीं व कागद तयार करण्याच्या गिरण्या, दळणाच्या गिरण्या, छापखाने वगैरे कितीतरी गोष्टी प्रत्यक्ष अवलोकन केल्या ! अशा प्रकारें पीटर युरोप खंडांत प्रवास करीत असतां, त्याच्या खास, तैनातींत असलेल्या 'स्ट्रेल्टझी' नांवाच्या शरीरसंरक्षक सैन्यानें बंड केलें असल्याची वाती त्यास समजली. तेव्हां रशियामध्ये शांतता राखण्यासाठीं तो तत्काळ निघाला व बंडखोर सैन्याचा पुरा सूड घेण्यासाठीं त्यानें हजारों सैनिकांस हालहाल करून ठार केलें. पीटरची ही कृति पाहून कित्येक- जण त्यास दोष देतील, परंतु झारच्या सत्तेस या सैन्याकडून नेहमींच विरोध होत असल्यामुळे, तें सैन्य नाहींसें करून त्या जागीं नवीन पद्ध- तीनें कवाईत शिकवून तयार केलेलें सैन्य स्थापन करावें म्हणूनच पीटरनें अशाप्रकारची कृति केली ! आपल्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणारी ही अडचण दूर केल्यावर युरोपमध्यें प्रवास करीत असतां प्रत्यक्ष अवलोकन केलेली पाश्चात्य संस्कृति आपल्या मागसलेल्या राष्ट्रावर लादण्याचा त्यानें निश्चय केला. त्याच्या " प्रेरणेनें रशियन लोकांचा पोषाख, त्यांच्या चालीरीति, केंस ठेवण्याची पद्धत देखील पाश्चत्य तऱ्हेवर जाऊन रशियन लोकांच्या आचारविचारांत