पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ वें. ] रशियाचा अरुणोदय. १५९ शरीरसंरक्षक सैन्याची कल्पना होती ! पीटरने गादीवर येतांच आपल्या अनियंत्रित सत्तेस कोणाकडून विरोध होत आहे हें ताडलें, व आपल्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणाऱ्या सर्व अडचणींचा नाश करून, त्यानें आपली सत्ता खरोखरीच अनियंत्रित केली ! पीटरच्या एकंदर वागणुकीवरून त्याच्या स्वभावाविषयीं निरनि- राळीं विधानें केलेली आढळतात ! पीटर हा आपली राक्षसी महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी वाटेल ते सुष्ट दुष्ट उपाय अमलांत आणी म्हणून त्यास पीटर धी ग्रेट. कित्येकांनीं क्रूरतेचा व निर्दयतेचा पुतळा ठरविलें आहे; तर कित्येक त्यानें राशियन लोकांच्या आचारविचारांत क्रान्ति घडवून आणून, रशिया- मध्यें युरोपियन सुधारणांचा प्रसार करवून त्या मागासलेल्या राष्ट्रास उन्नत स्वरूप प्राप्त करून दिलें म्हणून त्याची थोरवी गात आहेत ! तेव्हां पीटर- विषयीं निरनिराळ्या लेखकांच्या विधानांमध्यें अशी जमीनअस्मानाची तफावत पाहून हा खरोखरीच कोणत्या प्रकारचा पुरुष होता हैं ठरवितांना त्याच्या सर्व कृतींकडे बारकाईनें पाहिलें पाहिजे. त्याच्या एकंदर वागणुकीचें सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्याच्या वर्तनक्रमांत विसंगतपणा दिसत नसून तो तत्कालीन रशियन लोकांच्या आचारविचारांचा व परिस्थितीचा एक मूर्तिमंत पुतळाच आहे असें आपणास दिसून येईल ! रानटी व मागसले- ल्या अशा परिस्थितींत पीटर वाढला असून त्यानंतर संस्कृत व सुधारलेल्या विचारांचा त्याच्या मनावर थोडाबहुत पगडा बसला असल्यामुळे आपणास त्याच्या एकंदर आचरणांत रानटी तसेच सुधारलेले प्रकार आढळून येतात ! १६९५ च्या सुमारास पीटरला पुढें येण्यास चांगलीच संधि सांपडली.. त्या वेळेस टर्कीचें साम्राज्य हलके हलके विस्खळीत होत असून बादशहाचें टर्कीबरोबर युद्ध सुरू होतें. तेव्हां या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेकडे एखाद्या समुद्रापर्यंत आपलें साम्राज्य नेऊन भिडवावें असें वाटून १६९६