पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० वें. ] १४ व्या लुईच्या अमदानींतील फ्रान्सचा उत्कर्ष. १५१ नाँटचा जाहीरनामा रद्द करण्यांत येतो. १६८५. या सुमारास लुईच्या आयुष्यक्रमांत एक महत्त्वाची गोष्ट घडून आल्यामुळे त्याच्या यानंतरच्या वर्तनक्रमांत बरीच कान्ति झाली. मॅडेम मेन्टेनॉन या रोमन कॅथलीकपंथीय स्त्रीच्या प्रेमपाशांत तो सांपडल्या- मुळें, तिच्या प्रेरणेनें त्याचा पुढील कार्यक्रमही बदलला ! मॅडेम मेन्टेनॉन ही रोमन कॅथलीकपंथाची कट्टी अनुयायी होती व तिच्याच प्रेरणेनें प्रॉटे- स्टंट पंथीय लोकांचा छळ करून त्यांना रोमन कॅथलीक पंथाचा स्वीकार करावयास लावणें आपलें इष्ट कर्तव्य आहे असें त्यास वाटूं लागलें. पहिल्याप्रथम प्रॉटेस्टंट पंथीय लोकांपैकी कोणी रोमन कॅथलीक पंथ स्वीकारल्यास त्यास बक्षीस देण्यांत येत असे, परंतु १६८३ मध्य त्यानें मॅडेम मेन्टेनॉनशीं शास्त्रोक्त लग्न केल्यावर तो सर्वस्वी तिच्याच तंत्रानें वागूं लागला ! १६८५ मध्ये त्यानें सुमारें शंभर वर्षापूर्वी चवथ्या हेन्रीनें ह्युगेनॉट लोकांना धार्मिक सवलत देण्यासाठीं नाँट येथें प्रसिद्ध केलेला जाहीरनामा रद्द करून टाकून प्रॉटेस्टंट पंथाचा फ्रान्समधून पुरता उच्छेद करून टाकण्यासाठी कडक उपाय योजण्यास सुरुवात केली. परंतु `त्याच्या या अदूरदर्शी धोरणामुळे फ्रान्सचें जें नुकसान झालें, तें दुसऱ्या कोणत्याही गोष्टीनें भरून काढणें जवळ जवळ अशक्यच होतें असें म्हणा- वयास पाहिजे. लुईच्या धार्मिक जुलुमामुळे हजारों ह्युगेनॉट लोकांस फ्रान्स देश सोडून देऊन इंग्लंड, हॉलंड, अमेरिका, प्रशिया वगैरे फ्रान्सच्या शत्रुराष्ट्रांकडे पळ काढावा लागला ! या लोकांबरोबर त्यांचे उद्योगधंदेही अर्थातच परराष्ट्रांत गेल्यामुळे फ्रान्सचें अतो- नात नुकसान झालें व त्यामुळे या वेळेपासून फ्रान्सच्या अवनतीस सुरवात झाली ! लुईनें गेल्या दहा वर्षांमध्यें शांततेच्या काळांत परराष्ट्रांवर कोण- त्याही प्रकारचें कारण नसतां एकदम हल्ला करण्याचा उपक्रम सुरू केला