पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण . इकडे डच लोकांचा मुलूख एकसारखा पादाक्रान्त करीत फ्रेंच सैन्य हॉलंडची राजधानी आमस्टरडॅम या शहरानजीक येऊन ठेपलें ! अशा रीतीनें आपली राजधानी शत्रूच्या ताब्यांत जात आहे हें पाहतांच डच लोकांनीं जिवावर उदार होऊन, समुद्राच्या लाटांस थोपवून धरणारे मोठमोठाले दगडी बांधारे फोडून टाकून आपला सर्व प्रदेश जलमय करून टाकला ! सर्व प्रदेश जलमय होत आहे हें पाहतांच परत फिरण्यावांचून फ्रेंच सैन्यास गत्यंतरच नव्हतें ! या सुमारास युरोपियन राष्ट्रांचे फ्रान्स- 'बद्दलचें धोरण पार बदलून गेलें होतें. बादशहा व स्पेनचा राजा व इतर जर्मन संस्थाने यांना लुईच्या राक्षसी महत्त्वाकांक्षे: ची चीड येऊन तीं राष्ट्रें डच लोकांच्या मदतीस धांवून आलीं इतकेंच नव्हे तर इतकी वर्षे लुईला मदत करणाऱ्या इंग्लंडने इतःपर फ्रान्सचा संबंध तोडून डच लोकांशी तह केला (१६७४) आपला पक्ष सोडून युरोपियन राष्ट्रांनीं डच लोकांशी तह केला हैं पहातांच लुईची स्थिति फारच चमत्का- रिक झाली ! तेव्हां आतां तह करून हें युद्ध संपुष्टांत आणावें असें वाटून १६७८ मध्ये निमवेजिन येथें तह करण्यांत आला. व बर्गेडीचा मुलूख 'आपल्या हस्तगत झाला होता, त्यावरच लुईला संतुष्ट रहावें लागलें. डच लोकांच्या मद- तीस इतर युरोपियन राष्ट्र धांवून येतात. . १६७८ मध्यें निमवेजिन येथें तह होऊन तीन वर्षे झालीं नाहींत तोच लुईनें १६८९ मध्ये फ्रान्सच्या उत्तर व पूर्व सरहद्दीवरील कांहीं प्रदेश आपल्या राज्यास जोडण्याच्या इराद्याने युद्धाचें यत्किंचितही कारण उपस्थित झालें नव्हतें तरी बादशहाच्या ताब्यांत असलेल्या आलसास प्रांतांतील स्ट्रॅसबर्ग शहरावर एकदम हल्ला करून तें शहर जिंकून घेतलें. -याप्रसंगीं त्यास स्पेनशीं युद्ध करावें लागलें, परंतु १६८३ मध्ये रॅटीस बॉन शहरी तह होऊन हैं युद्ध थांबविण्यांत आलें. या तहान्वयें स्ट्रॅसबर्ग शहरा- वरील आपला हक्क आणखी वीस वर्षांनीं सोडून देण्याचें लुईनें -कबूल केलें.