पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ युरोपचा अर्वाचीन इतिहास.. :: [ प्रकरणा होता त्यामुळे युरोपियन राष्ट्रांनी चिडून जाऊन एक संघ स्थापन केला. लुईविरुद्ध युरोपियन राष्ट्रांचा संघ. बादशहा, डच लोकांचें राष्ट्र व स्पेन यांनी लुईविरुद्ध ऑग्जबर्ग येथें एक संघ स्थापन केला, व या वेळीं हॉलंडचा राजा वुइल्यम यास इंग्लंडचें राज्यपद मिळाले असल्यामुळे, त्यानें इंग्लंडलाही या युरोपियन राष्ट्रांच्या संघांत सामील करून घेतलें ( १६८८ ). फ्रान्स- विरुद्ध युरोपियन राष्ट्रांचा असा संघ निर्माण झाल्यावर, १६८८ मध्यें ऑग्जबर्गच्या संघानें लुईविरुद्ध युद्ध फुकारलें. हें युद्ध एकंदर ९ वर्षे - पर्यंत चालून, दोन्ही पक्ष सारखेच जेरीस आल्यामुळे १६९७ मध्ये रिसविक येथें तह होऊन हें युद्ध थांबविण्यांत आलें. या तहान्वयें कोणासही कांहींच फलनिष्पत्ति न होतां एकमेकांचा जिंकून घेतलेला प्रदेश एकमेकांस परत द्यावा लागला. . यानंतर स्पेनच्या राजकारणांत हात घातल्यास आपला बराच फायदा होण्याचा संभव आहे असें लुईला वाटूं लागलें. स्पेनचा राजा २ रा चार्लस हा मरणोन्मुख झाला असून, त्यास कोणी पुत्रसंतान नसल्या- मुळें, त्याच्यानंतर स्पेनचें राष्ट्र व स्पेनच्या ताब्यांत असलेला प्रदेश व वसाहती कोणास मिळणार हें कांहींच निश्चित नव्हतें ! ऑस्ट्रियावर राज्य करणाऱ्या हॅप्सबर्ग घराण्यांतील पुरुषाचा स्पेनच्या गादीवर हक्क होता; परंतु आपली पहिली पत्नी स्पेनच्या राजाची वडील बहीण होती तेव्हां तिच्या नात्यानें आपल्या नातवाचाही स्पेनच्या गादीवर स्पेनच्या गादीवर तितकाच हक्क आहेसें लुईस वारस कोणी यावयाचें ? वाटूं लागलें. तेव्हां आपल्या इच्छेच्या आड इंग्लंड- नें येऊं नये म्हणून पहिल्याप्रथम इंग्लंडशीं तह करून, त्यानें यानंतर स्पेनचें राष्ट्र, फ्रान्स व ऑस्ट्रिया यांमध्यें कसें वांटून घ्यावयाचे याबद्दल कांहीं तडजोड केली. लुइन अशाप्रकारची तडजोड करून थोडे दिवस झाले नाहींत तोंच स्पेनचा राजा २ रा चार्लस मरण पावला (१७००). मरणा-