पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० वें. ] १४ व्या लुईच्या अमदानीतील फ्रान्सचा उत्कर्ष. १४९ लुईला आपली हालचाल थांबविणे भाग पडलें. यानंतर . एक्स्लाशापेल. या ठिकाणी तह होऊन लुईस आपल्या उत्तर सरहद्दीवर मिळालेल्या थोड्या प्रदेशावरच संतुष्ट रहावें लागलें ( १६६८ ). अशा प्रकारें तह करून स्वस्थ बसणें लुईस मुळींच आवडलें नाहीं, तर डच लोकांनीं इंग्लंड व स्वीडन या राष्ट्रांचें साहाय्य घेऊन आपणास आपली महत्त्वाकांक्षा सफल होण्याचा समय आला असतां ती सोडून देणें भाग पाडलें हें पाहून डच राष्ट्रावर पुरता सूड उगविण्याचा बेत लुई रचूं लागला. त्यानें बादशहा व स्वीडनचा राजा यांच्यापासून लोकांशीं पुन:युद्ध करण्याचा प्रसंग आल्यास आपण तटस्थ राहूं अशा प्रकारचें 'वचन घेऊन इंग्लंडचा राजा २ रा चार्लस याच्याशीं डोव्हर येथें एक गुप्त तह ( १६७० ) करून, हॉलंडशीं युद्ध करण्याचा प्रसंग आल्यासा इंग्लंडने मदत करण्याचें वचन घेतलें. अशा प्रकारें सर्व व्यवस्था केल्यावर १६७२ मध्यें लुईनें इंग्लंडची मदत घेऊन डच लोकांवर हल्ला केला. यावेळीं डच लोकांस परकीय राष्ट्रांकडून कोणत्याच प्रकारची मदत: न मिळाल्यामुळे, त्यांचा पराभव होऊन बहुतेक सर्व प्रदेश फ्रेंच लोकांच्या ताब्यांत गेला. आपल्या प्रजासत्ताक राज्याचा अध्यक्षच कर्तृत्ववान् नस-- ल्यामुळे आपला असा पराभव होत आहे असें वाटून डच लोकांनीं आपला अध्यक्ष जॉन-डी-वेट याचा वध करून पूर्वी पदच्युत झालेल्या ऑरेंज घराण्यांतील ३ रा बुइल्यम नांवाच्या पुरुषास आपला सेनापति केलें. वुइल्यम हा जरी लोकोत्तर बुद्धिमत्तेचा पुरुष नव्हता तरी आतां आपल्या राष्ट्रावर कोणती आपत्ति आली आहे, व त्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत याची त्यास पूर्णपणे जाणीव असल्यामुळे त्यास आपल्या राष्ट्राचा परकीय शत्रूपासून बचाव करतां आला ! आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठीं प्रत्येकानें चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत इतकेंच नव्हे, तर आपलें सर्वस्व वुइल्यम ऑफ ऑरेंज. व प्राण खर्च करण्यास तत्पर झालें पाहिजे असें त्यानें आपल्या देशबांधवां-- च्या मनांत भरवून दिलें.