पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. प्रकरण धंदे वाढत जाऊन फ्रान्सची सांपत्तिक स्थिति फारच समाधानकारक झाली. युरोपमध्यें फ्रेंच राष्ट्र पहिल्या प्रतीचें ठरून इतर सर्व युरोपियन राष्ट्र फ्रान्सचें अनुकरण करूं लागलीं. आपल्या राष्ट्राचे इतकें वैभव वाढलेलें लुईची महत्त्वाकांक्षा. . आहे, तरी एवढ्यानेंच समाधान न पावतां लुईची महत्त्वाकांक्षा भलतीकडेच वहावत चालली ! आपलें राष्ट्र फारच बलाढ्य असल्यामुळे आपल्याशीं टंक्कर देण्यास आपल्या शेजारचीं बारकीं राष्ट्रं धजावणार नाहींत असें वाटुन त्यांस आपल्या अंकित करावेंसें त्यास वाटूं लागलें. अशा प्रकारची लुईची महत्त्वाकांक्षा असून त्यानें १६६७ पासून परराष्ट्रीय राजकारणांत विनाकारण हात घालून आपल्या शेजारच्या बारक्या राष्ट्रांस आपलें अंकित करावें या हेतूनें केलेल्या प्रयत्नामुळे पहिल्याप्रथम जरी त्यास यश मिळत गेलें, तरी सरतेशेवटीं इतर युरोपियन राष्ट्रांनीं त्याची महत्त्वा- कांक्षा थोपवून धरण्यासाठीं त्याच्या विरुद्ध कट रचल्यामुळे १४ व्या लुईच्या अमदानीत फ्रान्सच्या अवनतीचें बीज पेरलें गेलें असें म्हणावयास हरकत नाहीं. स्पॅनिश नेदर्लंडवर स्वारी. १६६७ मध्यें लुईनें स्पॅनिश नेदर्लंड प्रांतावर आपल्या पहिल्या पत्नीच्या बाजूनें आपला हक्क आहे असें म्हणून एकदम स्वारी केली. लुईचें सैन्य पहिल्याप्रतीचें असल्यामुळे त्यास एकसारखा जय मिळत गेला. गेल्या युद्धामध्यें स्पेनची सत्ता फारच खालावली होती तेव्हां स्पेनकडून त्या प्रांताचें संरक्षण होणे अगदींच अशक्य होतें; व या वेळीं नेदर्लंडमधील डच लोकांनी आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा नेटानें प्रयत्न केला नसता तर एका क्षणांत लुईनें सर्व नेदर्लंडप्रदेशावर आपलें निशाण रोवलें असतें ! परंतु यावेळीं स्वदेशप्रीतीनें प्रेरित झालेला, डच लोकसत्ताक राज्याचा अध्यक्ष जॉन-डी-वेट यानें लुईची महत्त्वाकांक्षा थोपवून धरण्यासाठीं इंग्लंड व स्वीडन या राष्ट्रांचें साहाय्य घेतल्यामुळे