पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० . ] १४ व्या लुईच्या अमदानींतील फ्रान्सचा उत्कर्ष. १४७ पायावर उभारणी केली ! लुईनें आपल्या राज्यकारभारामध्ये ज्या मह-- त्त्वाच्या सुधारणा केल्या त्यांमध्यें कोलबर्ट ( १६१९-१६८३) नांवाच्या पुरुषानें त्यास बरीच मदत केली. जमाबंदीच्या खात्यांत पुष्कळ गोंधळ: माजलेला होता ! उत्पन्नापेक्षां राष्ट्राचा खर्चच अधिक वाढत असून त्या गोष्टीस लांचलुचपतीचेच प्रकार अधिक कारणीभूत होत असल्यामुळे ते प्रकार बंद केल्यावर, कोल- बर्टला सुव्यवस्थित रीतीनें त्या खात्याची उभारणी कोलबर्टची कामगिरी. करतां येऊन, राष्ट्राचें उत्पन्न वाढवितां आलें. कोलबर्टनें केलेल्या महत्त्वा-- च्या गोष्टींपैकीं, त्यानें अमलांत आणलेली संरक्षित व्यापाराची पद्धत. विशेष प्रसिद्ध आहे. आपल्या राष्ट्राची सांपत्तिक स्थिति वाढावी या हेतूनें त्यानें आपल्या राष्ट्रांतून परदेशांत जाणाऱ्या मालास उत्तेजन देऊन आयात मालावर संरक्षक जकात बसविली. अशा प्रकारें आयात व निर्यात व्यापारापैकीं एकास उत्तेजन देऊन दुसऱ्याकडे अगदींच दुर्लक्ष केल्या- पासून राष्ट्राचा फायदा होण्याचा संभव आहे कीं नाहीं, याविषयीं मतभेद असला तरी कोलबर्टच्या वेळीं, त्यानें केलेल्या व्यवस्थे- मुळें, फ्रान्समधील उद्योगधंदे व व्यापार यांस उत्तेजन मिळालें वः जगांतील सर्व बाजारपेठा फ्रेंच मालांनी हस्तगत करून त्यापासून फ्रान्सची सांपत्तिक स्थिति सुधारली एवढें मात्र खरें ! फ्रेंच लोकांनीं अमेरिका, हिंदुस्थान वगैरे दूरदूरच्या प्रदेशांत जाऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन कराव्यात या हेतूनें धाडशी लोकांस कोलबर्टकडून उत्तेजन मिळत गेलें.. अशाप्रकारचें कोलबर्टचें परराष्ट्रीय धोरण असून आपल्या राष्ट्रामध्यें दळण- वळणाचे मार्ग सुलभ होऊन राष्ट्रांतील एका ठिकाणचा माल दुसरीकडे, सुलभ रीतीनें नेतां यावा म्हणून त्यानें ठिकठिकाणी रस्ते व. कालवे खणले ! अशा प्रकारें लुई गादीवर येऊन फार वर्षे झालीं नाहींत तोंच कोलबर्टनें केलेल्या महत्त्वाच्या सुधारणांमुळे फ्रान्सचा व्यापार व उद्योग-