पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१ लें. ]
विषय-प्रवेश.

१३


त्यांस अवगत असलेलें कलाकौशल्य फारच उच्च दर्जाचें असल्यामुळे, अरबलोकांच्या संघट्टणानें युरोपियन लोकांस कितीतरी नव्या गोष्टींची माहिती होऊन वैद्यकशास्त्र, गणितशास्त्र, कलाकौशल्य यांचा युरोपमध्ये प्रसार होण्यास मदत झाली.
 अरब लोकांप्रमाणें व्यापारउदीम करावा व आपल्या राष्ट्रांची सांपत्तिक उन्नति करून घ्यावा अशी स्पर्धा युरोपियन राष्ट्रांमध्ये सुरू झाली. पहिल्याप्रथम भूमध्यसमुद्राला लागून असलेल्या इटलीच्या द्वीप- कल्पावरील व्हेनीस, जेनोआ, या लहानलहान राष्ट्रांनीच या बाबतींत अग्रे- सरत्वाचा मान संपादन केला. या लहान राष्ट्रांची व्यापारवृद्धीमुळें भर- भराट झालेली पाहून स्पेन व पोर्तुगाल या राष्ट्रांच्या तोंडासही पाणी सुदूं लागलें. पूर्वेकडे सुवर्णभूमि या नांवानें प्रसिद्ध असलेल्या हिंदुस्थान देशाशीं व्यापार करून आपल्या राष्ट्रांची सांपत्तिक व औद्योगिक उन्नति करून घ्यावी असें पोर्तुगीज व स्पॅनिअर्ड लोकांस बाहूं लागल्यामुळे त्यांचे त्या दिशेने प्रयत्न होऊं लागले. हिंदुस्थानाकडे जाणारा जलमार्ग शोधून ) काढण्यासाठीं त्यांनीं मोठमोठाल्या सफरी केल्या. स्पॅनिअर्ड व पोर्तुगीज यांच्याकडून अशा प्रकारचे प्रयत्न सुरू असतां स्पेनच्या राजाच्या नोक- रीस असलेल्या कोलंबस नांवाच्या पुरुषानें १४९२ मध्यें अमेरिकेचा शोध लावला. इकडे पोर्तुगीज लोकांच्या प्रयत्नास मात्र खरोखरीच यश येऊन १४९८ सालीं वास्को-डी-गामा यानें आपलें जहाज आफ्रिका खंडाच्या किनाऱ्यास वळसा देऊन थेट हिंदुस्थानच्या किनान्यास नेऊन भिडविलें. पंधराव्या शतकाच्या शेवटीं हिंदुस्थान व अमेरिका या दोन विस्तीर्ण प्रदेशांशी पोर्तुगीज व स्पॅनिअर्ड यांचा संबंध आल्यानें, त्या देशांत जाऊन आपला व्यापार वाढवावा, तेथें आपल्या वसाहती स्थापन कराव्यात अशी त्यांस साहजिकच इच्छा उत्पन्न झाली.
अमेरिका व हिंदु- स्थान या दोन विस्तीर्ण प्रदेशांचा शोध.  दक्षिण युरोपमधील राष्ट्रांकडून अशा प्रकारचे प्रयत्न होत असतां इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन वगैरे उत्तरयुरोपमधील राष्ट्र या बाबतींत