पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ [ प्रकरण युरोपचा अर्वाचीन इतिहास. मागेंच होतीं. आफ्रिकाखंडास वळसा देऊन हिंदुस्थानाकडे जाणाऱ्या जल- मागीवर पोर्तुगीज लोक, त्याचप्रमाणें पश्चिमेकडून अमेरिका खंडाकडे जाणाऱ्या जलमार्गावर स्पॅनिअर्ड लोक, हे आपापला हक्क सांगून परराष्ट्रां- पासून वरील दोन जलमार्गांचें संरक्षण करण्यास डोळ्यांत तेल घालून दक्ष असल्यानें हिंदुस्थानदेशाशीं व्यापार करावयाचा तर दुसरा एखादा जलमार्ग शोधून काढल्याखेरीज युरोपियन राष्ट्रांस गत्यंतरच नव्हतें. वायव्य दिशेकडून असा एखादा मार्ग शोधून काढण्याचें इंग्लंडचे सर्व प्रयत्न जरी निष्फळ ठरले व हिंदुस्थाना- कडे जाणारा जलमार्ग त्यांस सांपडला नाहीं, तरी त्यांच्या या वेळीं झालेल्या प्रयत्नांनी उत्तर अमेरिकेच्या कांहीं भागांवर वर्चस्व स्थापण्याचे कामी मात्र मदत झाली. पुढें इलिझाबेद राणीच्या कारकीदींत स्पेनच्या बलाढ्य आरमाराचा पराभव केल्यावर इंग्लंडचें आरमारी वर्चस्व वाढलें, व पोर्तुगीज लोकांशीं दर्यावर टक्कर देऊन त्यांनी शोधून काढलेल्या मार्गानेंच इंग्लंडला हिंदुस्थानाशीं दळणवळण सुरू करतां आलें. अर्वाचीन युगाच्या सुरुवातीस असलेली युरोपियन राष्ट्रांची परिस्थिति. अर्वाचीनयुगाच्या सुरुवातीस युरोपियन राष्ट्रांची कशी परिस्थिति होती हें सांगतांना पहिल्याप्रथम 'पवित्र रोमन साम्राज्या'चा उल्लेख करणें अत्यावश्यक आहे. मध्ययुगाच्या सुरुवातीस रानटी टोळ्यांनी हल्ला करून सर्व प्रदेश उध्वस्त करून टाकण्यापूर्वी युरोपमध्ये असलेल्या रोमन साम्राज्या- चाच हा एक अवशेष शिल्लक राहिला होता. रानटी टोळ्यांनीं रोमन साम्राज्यांत मोडणाऱ्या प्रदेशावर जरी आपापल्या वसाहती स्थापन केल्या होत्या, तरी रोमन लोकांची सुसंस्कृत राज्यपद्धति, त्यांची उच्च दर्जाची संस्कृति, त्यांचें ज्ञान, कलाकौशल्याच्या गोष्टींमध्यें त्यांनीं केलेली प्रगति वगैरे गोष्टींमुळें रानटी व अडाणी लोकांचे डोळे अर्थातच दिपून गेले ! युद्ध करून आपल्या लष्करी सामर्थ्यानें जरी त्यांना रोमन साम्राज्यावर विजय मिळवितां आला तरी रोमन संस्कृति, रोमन आचारविचार, रोमन