पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण या वेळी बंदुकीच्या दारूचा शोध लागल्याने घोडेस्वार व कनिष्ठ समजले जाणारे पायदळ शिपायी यांच्यामध्यें उच्चनीच दर्जा कमी होऊन घोडे- स्वारांस पूर्वीप्रमाणें मान मिळेनासा झाला. खालच्या वर्गाच्या शिपायांचाच सैन्यांत भरणा होऊन त्यांचा उपयोग राजेरजवाडे करूं लागल्यामुळें, घोडे राजसत्ता अनित्रं- त्रित होते. बाळगण्याची ऐपत असणाऱ्या अमीरउमराव सरदा- रमंडळींचें महत्त्व अर्थातच कमी झालें ! अमीरउम- रावांचं महत्त्व कमी झाल्यामुळें राजसत्तेवर त्यांचा पूर्वापार असलेला वचक कमी होऊन राजसत्ता अनियंत्रित होण्यास यायोगें मदत झाली असें म्हटलें पाहिजे. इकडे प्राचीन कलाविद्यांचें पुनरुज्जीवन होऊन ज्ञानाचा फैलाव सामान्य जनतेपर्यंत झाल्यानें उद्योगधंदे व व्यापारउदीम यांमध्ये लोक अधिक लक्ष्य घालूं लागले. पूर्वीच्या काळची स्थिति आतां पार बदलून जाऊं लागली. पूर्वीच्या काळी शेतकीचा धंदाच कायतो सर्वसंमत मानला गेल्याने मोठमोठ्या जमिनींची मालकी असलेल्या अमीरउमराव लोकांचेंच समाजांत बरेंच वर्चस्व असे. परंतु मध्ययुगाच्या शेवटीं शेतकी - प्रमाणें इतर धंदेही सर्वसंमत होऊं लागून त्यायोगें खालच्या दर्जाच्या माणसासही आपापल्या कर्तबगारीप्रमाणें वर येण्यास संधि मिळू लागली. ठिकठिकाणी मोठमोठी शहरें निर्माण होऊन उद्योगधंदे व व्यापारउदीम यांचीं हीं शहरें म्हणजे आगरच होऊन बसलीं ! अकराव्या व बाराव्या शतकांत एशिया मायनरमधील ख्राइस्टची जन्म.. भूमि महंमदी धर्मीय लोकांकडून परत मिळविण्या साठीं ख्रिश्चनधर्मीय लोकांनीं थेट पॅलस्टाईनपर्यंत जाऊन जीं धर्मयुद्धे केलीं, त्यामुळें व्यापार व उद्योगधंदा यांची वृद्धि या दृष्टीनेही युरोपचा फायदाच झाला असें म्हण- ण्यास हरकत नाहीं. अकराव्या व बाराव्या शतकांतील युरोपियन लोकां- पेक्षां तत्कालीन महंमदी धर्मीय अरब लोकांची संस्कृति, त्यांचें ज्ञान व व्यापार व उद्योग- धंदे यांकडे युरोपियन जनतेचें लक्ष्य लागतें.