पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण अमीरउमरावांनी मॅझरीनच्या सत्तेविरुद्ध कट रचला असल्यामुळे एकीकडून अंतस्थ कलह व दुसरीकडून परचक्र येण्याची भीति या कैचींत फान्स सांपडल्यामुळें फ्रान्सची स्थिति फारच चमत्कारिक झाली होती ! परंतु मॅझरीननें आपल्या कर्तबगारीनें अमीरउमरावांचा कट मोडून टाकून आपलें सर्व सामर्थ्य स्पेनची खोड मोडण्याकड़े खर्च केल्यामुळे, स्पेनचा पराभव होऊन त्यास पिरनीजचा तह करणें भाग पडलें. यावेळीं अंतस्थ अस्वस्थता व परराष्ट्रीय युद्ध यामुळें स्पेनची सत्ता अगदीं ख चालली होती, व आतां १६५९ मध्यें पिरनीजचा तह करणें स्पेनला भाग पडल्यामुळे तर स्पेनचें युरोपखंडांत असलेलें वर्चस्व अजीबात नाहींसें होऊन तें राष्ट्र दुसऱ्या प्रतीच्या दर्जाप्रत जाऊन पोहोंचलें. अशारीतीनें स्पेनचा पराभव होऊन, फ्रान्सचें वर्चस्व युरोपमध्यें प्रस्थापित केल्यावर मॅझरीन १६६१ मध्ये मरण पावला. मॅझरीनच्या मृत्यूनंतर फ्रान्सच्या गादीवर असलेल्या तेवीस वर्षांच्या लुई राजानें राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातांत घेतलीं. याच्या अमदानीत फ्रान्समधील राजसत्ता पूर्णपणें अनियंत्रित होऊन, प्रधान व दुसरे मोठमोठ्या हुद्यावरील नोकर म्हणजे राजाचे कारकूनच होऊन राहिले होते. लुई हा मोठा कर्तृत्ववान् व महत्त्वाकांक्षी असल्यामुळे त्याच्या अमदानीत अनियंत्रित राजसत्तेचें उग्र स्वरूप अधिकच प्रगट होऊं लागलें. गादीवर आल्यावर १४ व्या लुईनें आपल्या राष्ट्राच्या राज्यकारभारा- संबंधीं पुष्कळ महत्त्वाच्या सुधारणा केल्या! त्यानें आपल्या राष्ट्राचें आरमार व लष्कर सुधारून तें उत्कृष्टप्रतीचें केलें. अंतस्थ व परराष्ट्रीय राजकारण यांच्या व्यवस्थे- संबंधीं त्यानें महत्त्वाचे फेरफार केले. जमाबंदीच्या १४ व्या लुईनें केलेल्या सुधारणा. खात्यामध्यें जो गोंधळ माजलेला होता तो नाहींसा करून त्याची भक्कम