पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० वें. ] १४ व्या लुईच्या अमदानीतील फ्रांन्सचा उत्कर्ष. १४५. धोरण पुढे चालविलें. १६४८ मध्यें वेस्टफॅलियाच्या तहाच्या वेळीं फ्रान्सच युरोपखंडांत वर्चस्व प्रस्थापित केल्यावर त्यास फ्रान्सच्या अंतस्थ गडबडीकडे आपलें सर्व लक्ष घालतां आलें. या- मँझरीन धोरण. . वेळीं, फ्रान्सच्या गादीवर 'अल्पवयी राजा आहे पाहून रिशल्यूनें आपले हिरावून घेतलेले राज- कीय हक्क पुनरपि संपादन करावेत असें वाटून फ्रान्समधील अमीर- उमरावांनीं कॉन्डे नांवाच्या सरदाराच्या नेतृत्वाखालीं मॅझरीनची सत्ता उलथून पाडण्यासाठीं एक कट रचला. • राजसत्तेकडून लोकांचे न्याय्य हक्क हिरावून घेतलेले असून ते परत मिळविण्यासाठींच आपला हा प्रयत्न आहे असें जरी अमीरउमरावांनी दाखविण्याचा प्रयत्न केला होता, तरी आपलीच सत्ता वाढविण्यासाठीं अमीरउमरावांकडून हा प्रयत्न होत आहे हें बहुजनसमाजाच्या लक्षांत येऊन त्यांचें या कटास पाठबळ मिळालें नाहीं ! तेव्हां मॅझरिनला हा कट ( १६४८ - १६५३ ) • तत्काळ मोडतां आला. अशाप्रकारें आपले राजकीय हक्क परत मिळ- विण्यासाठीं सरदार लोकांकडून करण्यांत आलेला प्रयत्न. अजीबात निष्फळ झाल्यानंतर, फ्रान्समधील अमीरउमरावांचा वर्ग अगदीच निरु- पद्रवी होऊन ऐषआरामांत व ख्यालीखुशालींत दिवस काहूं लागला.. १६४८ मध्ये झालेल्या वेस्टफॅलियाच्या तहानें जर्मनीमध्यें उद्भूत झालेलें धर्मयुद्ध संपुष्टांत आलें, तरी फ्रान्स व स्पेन यांच्यामध्यें कांहींच तडजोड होईना ! गेल्या युद्धामध्यें फ्रान्सनें स्पॅनिश नेदर्लंडमधील बराच प्रदेश जिंकून घेतला होता; त्यामुळें व वेस्टफॅलियाच्या तहाच्या वेळीं या प्रदेशावर कोणाची मालकी असावी याबद्दल फ्रान्स व स्पेन यांच्यामध्यें समाधानकारक रीतीनें कांहींच तडजोड न होतां वेस्टफॅलियाच्या तहानें सर्व युरोपभर जरी शांतता प्रस्थापित झालेली होती, तरी फान्स व स्पेन यांच्यामधील कलहाग्नि तसाच धुमसत राहिला ! यावेळीं फ्रान्समधील स्पेनशीं युद्ध.