पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रिशल्यूची कामगिरी. प्रकरण १० वें. १४ व्या लुईच्या अमदानींतील फ्रान्सचा उत्कर्ष. खत्तराव्या शतकामध्ये १४ व्या लुईच्या अमदानीत युरोपमध्यें फ्रान्सचा जो उत्कर्ष होत गेला, त्याचा पाया प्रख्यात मुत्सद्दी रिशल्यू यानेंच घातला होता. फ्रान्समधील अमीरउमराव त्याचप्रमाणें प्रॉटे- स्ट पंथीय ह्युगेनॉट लोक यांचे प्रस्थ कमी केल्यावर त्यास फ्रान्समधील राज- सत्ता अनियंत्रित करतां आली; व यानंतर युरोपि- यन राज्यकारणांत हात घालून फ्रान्सचा फायदा करून घेण्यास अवसर सांपडला. जर्मनीमध्यें उद्- भूत झालेल्या धर्मयुद्धांत हात घातल्यास फ्रान्सचा बराच फायदा होईल असें वाटून रिशल्यूनें पहिल्याप्रथम त्या युद्धांत भाग घेतला, व त्याच्या कल्पनेप्रमाणें १६४८ मध्ये जेव्हां हें युद्ध थांबलें त्यावेळीं झालेल्या वेस्ट- फॅलियाच्या तहान्वयें फ्रान्सला आपल्या उत्तर व पूर्व सरहद्दीवरील बराच प्रदेश मिळून फ्रान्सचें राष्ट्र युरोपमध्यें फारच बलाढ्य झालें. रिशल्यूच्या प्रयत्नानें फ्रान्सचा असा उत्कर्ष होत असतां, पुनरपि अंतस्थ कलहामुळें फ्रान्समध्यें अनास्था माजते कीं काय अशी भीति वाटू लागली ! फ्रान्सचा राजा १३ वा लुई मरण पावल्यावर (१६४३ ) त्यानंतर गादीवर येणारा त्याचा पुत्र अगदींच अल्पवयी असल्यामुळे ( पांच वर्षांचा ) राज्यकारभाराची सर्व जोखीम अर्थातच राजाची आई ॲन हिच्या अंगावर पडली ! परंतु यावेळीं ॲन राज्ञीनें मुळींच न डगमगतां राज्यकारभाराची सर्व जोखीम मॅझरीन नांवाच्या तिच्या विश्वासांतील एका धर्माधिकाऱ्यावर सोपवून त्यास मुख्य प्रधानाचीं वस्त्रे दिलीं. मॅझरीन हा रिशल्यूप्रमाणेंच कर्तृत्ववान व दूरदर्शी असल्यामुळें त्यानें त्याचें