पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वें. ] सतराव्या शतकांतील इंग्लंड. १४३ व्याप्तीबद्दल जो झगडा चालला होता, त्याचा कायमचा निकाल लागून इंग्लंडच्या राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे पार्लमेंटच्या हातांत आली असें म्हटलें पाहिजे ! यानंतर धार्मिक बाबतींत कांहीं लोकांवर जो अन्याय होत असे तो दूर करण्यासाठी १६८९ मध्ये एक कायदा पास करण्यांत आला. या कायद्यामुळे प्युरीटन, डिसेंटर, वगैरे पंथाच्या लोकांना आपा- पल्या मताप्रमाणें जाहीर प्रार्थना करण्याची मोकळीक देण्यांत आली !