पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ युरोपचा अर्वाचीन इतिहास... [ प्रकरण जेम्सनंतर इंग्लंडचें राज्यपद मेरीला न मिळतां, तें जेम्सच्या मुलाला मिळ- णार, व जेम्सच्या देखरेखीखालीं त्याचें सर्व शिक्षण होणार असल्यानें त्याचा रोमन कॅथलीकपंथाकडेच ओढा राहून सर्व इंग्लंडवर तो धर्मपंथ लादण्यांत येईल अशी सर्वांस भीति वाटू लागली. सर्व जनतेची अशाप्रकारची मनःस्थिति असतांना याच सुमारास धार्मिक बाबतीत राजाचा हुकूम अमान्य केल्याच्या अपराधावरून धर्माधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्यामुळें लोकांचें पित्त खवळलें; व त्यावेळेस कांहीं देशाभिमानी सरदारांनीं तर लोकांच्या मनःस्थितीचा फायदा घेऊन हॉलंडचा राजा वुइल्यम व त्याची पत्नी मेरी यांना इंग्लंडमध्यें येण्याविषयीं निमंत्रण दिलें. १६८८ च्या नोव्हेंबर महिन्यांत वुइल्यम इंग्लंडच्या किनाऱ्यावर उतरल्यावर त्यास लागलीच इंग्लिश जनतेचं पाठबळ मिळालें. जेम्सनें इंग्लंडमधील राजक्रांति १६८८. वुइल्यमचा मोड करण्यासाठी पाठविलेल्या सैन्यानें देखील वुइल्यमबरोबर युद्ध करण्याचें नाकारलें-: तेव्हां आपणास कोणीकडूनही मदत मिळण्याचा संभव नाहीं हें पहातांच जेम्सने इंग्लंडमधून पळ काढला ! इकडे पार्लमेंटनें ' जेम्सनें राज्यपदाचा त्याग केला आहे' असें जाहीर करून वुइल्यम व मेरी यांना इंग्लंडचें राज्यपद स्वीकारण्याविषय विनंति केली. २ रा जेम्स यास पुत्र असल्यानें वुइल्यम व मेरी यांचा इंग्लंड-- च्या गादीवर कायदेशीर रीतीनें हक्क नव्हता, परंतु केवळ पार्लमेंटच्या संमतीनेंच त्यांना इंग्लंडचें राज्यपद मिळाल्यामुळे या वेळेपासून राजसत्ते-: वर पार्लमेंटचें वर्चस्व प्रस्थापित झाल्यासारखें झालें. यानंतर राजसत्ता कायमची नियंत्रित करण्याच्या हेतूनें पार्लमेंटनें. १६८९ मध्ये ' लोकांच्या हक्काचा कायदा ' पास करून घेतला. हा कायदा पास झाल्यावर स्टुअर्ट घराण्या- च्या अमदानींत राजा व पार्लमेंट यांच्यामध्ये एकमेकांच्या अधिकार- पार्लमेंटचें वचस्व.