पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वें. ] सतराव्या शतकांतील इंग्लंड. १४१ रीतीनें २५ वर्षे राज्य केल्यावर १६८५ मध्यें चार्लस मरण पावला; -मरतेसमयीं आपण रोमन कॅथलीक पंथाचे अनुयायी आहोंत हें त्यानें -कबूल केलें. चार्लसनंतर गादीवर येणारा दुसरा जेम्स हा रोमन कॅथलीक "पंथाचा अनुयायी होता इतकेंच नव्हे तर रोमन कॅथलीक पंथाचा प्रसार करणें आपलें इष्ट कर्तव्य आहे असें त्यास वाटत होतें; व याखेरीज - आपल्या बापाप्रमाणेच त्याचे राजकीय विचार चमत्कारिक असून आपल्या हातांत अनियंत्रित सत्ता असावी असें त्यास वाटत असल्यानें तो गादीवर येऊन थोडे दिवस झाले नाहींत तोंच, प्रजेस त्याजबद्दल तिटकारा वाटू . लागला. गादीवर आल्यावर दोन वर्षांनींच जेम्सनें आपल्या भावाप्रमाणेंच 'सर्व धर्माच्या लोकांना धार्मिक बाबतींत आपापल्या मताप्रमाणें वागण्याची दुसरा जेम्स. राजास - मुभा आहे' अशा प्रकारचा जाहीरनामा प्रसिद्ध करून तो प्रत्येक चर्च - .मध्यें धर्माधिकाऱ्यानें वाचून दाखवावा असा हुकूम सोडला. परंतु सात प्रमुख धर्माधिकाऱ्यांनी तर राजाचा वरील हुकूम अमान्य करून अशाप्रकारें पार्लमेंटच्या संमतीशिवाय लोकांवर हुकूम करण्याचा अधिकार नाहीं ? असें लेखी कळविलें. धर्माधिकाऱ्यांचें हें उद्धट वर्तन पाहून जेम्सनें त्यांना कोर्टासमोर उभें राहण्याचें फर्माविलें ( १६८८ ). अशारीतीनें - गादीवर येऊन तीन वर्षे झालीं नाहीं तोंच जेम्सविरुद्ध इंग्लिश जनतेचें मन खवळून गेलें; परंतु जेम्सला पुत्रसंतान नसल्यामुळे त्याची मुलगी मेरी ( ही हॉलंडचा प्रॉटेस्टंट पंथी राजा वुइल्यम याची पत्नी असून प्रॉटेस्टंट- पंथाची कट्टी अभिमानी होती ) ही इंग्लंडच्या गादीवर यावयाची अस- •ल्यामुळे, तिच्या अमदानींत प्रॉटेस्टंट पंथाचा सर्वत्र पुरस्कार होईल असें वाटून इंग्लिश जनता स्वस्थ असे. परंतु१६८८च्या जून महिन्यांत जेम्सला पुत्र झाल्याची बातमी समजतांच इंग्लिश जनतेची फारच निराशा झाली.