पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण १६७८ झालीं निमवेजेन या ठिकाणी तह करून १४ व्या लुईस, हॉल- डशीं सुरू असलेलें युद्ध थांबवावें लागलें. आपापल्या धर्मपंथा- २ या चार्लस राजानें सर्व लोकांस प्रमाणें चालण्याची मुभा ठेवली होती ती त्यास परत घ्यावयास लावून पार्लमेंट स्वस्थ बसलें असें नव्हे, तर पुनः आपल्या धर्मपंथावर इतर धर्म- पंथांकडून हल्ला येण्याचा संभवच राहूं नये या हेतूनें पार्लमेंटने १६७३ चार्लसची शेवटची वर्षे. सालीं ' टेस्ट अॅक्ट' नांवाचा कायदा पास केला. १६६१ सालीं पास झालेल्या कायद्यानें म्युनिसि- पालिटीमधील नोकरांनाच आपणास इंग्लंडचा धर्मपंथ मान्य असल्याची शपथ द्यावी लागत होती, परंतु या नवीन पास झालेल्या अॅक्टनें कोण- त्याही हुद्याच्या सरकारी नोकरांना तशी शपथ घेणें भाग पडे. १६७३ पासून १६८९ पर्यंत चार्लसला पार्लमेंटशीं झगडावें लागले. या अवधीत शाफ्टस्बरी नांवाच्या गृहस्थाच्या नेतृत्वाखालीं पार्ल- मेंटमधील सभासदांनी चार्लसचा मुख्य प्रधान डॅन्बी याजवर कडक टीका- प्रहार करून त्याची चौकशी करवली. यानंतर इंग्लंडमध्यें रोमन कॅथलीक- पंथीय लोकांनीं एक भयंकर कट रचला आहे अशी एक खोटीच कंडी उठल्यामुळे इंग्लंडमधील लोक हवालदील होऊन रोमन कॅथलीक लोकां- विरुद्ध अधिकाधिक कडक निर्बंध होऊं लागले. १६८९ सालीं तर चार्लस- नंतर त्याचा भाऊ जेम्स हा रोमन कॅथलीक पंथाचा अनुयायी असल्यामुळे त्यास राज्यपद देण्यांत येऊं नये अशा प्रकारची सूचना कामन्स सभेत पास झाली होती; परंतु ती सूचना लॉर्ड लोकांच्या 'सर्भेत फेटाळून लावण्यांत आल्यामुळे जेम्सला चार्लसनंतर इंग्लंडची गादी मिळाली. यानंतर पार्लमेंटमधील शाफ्टस्बरी व त्याचे अनुयायी यांचे वर्चस्व कमी झाल्यामुळे चार्लसला ( १६८१-१६८५) आपलीं शेवटचीं पांच वर्षे वाटेल तसा राज्यकारभार करतां आला. अशा