पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वें. ] सतराव्या शतकांतील इंग्लंड. १३९ पणा स्वीकारण्यास लावण्याचे १४ व्या लुईनें ठरविलें. आपली महत्त्वा- कांक्षा पूर्ण करण्यासाठीं १४ व्या लुईनं १६६७ मध्ये स्पॅनिश नेदर्लंड प्रांतावर हल्ला करून कांहीं शहरें बळकावलीं ! परंतु आपल्याविरुद्ध इंग्लंड, • हॉलंड व स्वीडन या राष्ट्रांनीं त्रिकुटी संघ स्थापन केलेला पाहून लुई तितकाच थांबला; व आपली महत्त्वाकांक्षा सफल करून घेण्याच्या कामी आपणांस इंग्लंडचें साहाय्य निदान इंग्लंडला तटस्थपणा तरी स्वीकार- ण्यास लावणे भाग आहे हें पाहून १६७० मध्ये त्यानें इंग्लंडचा राजा -२ रा चार्लस याच्याशीं डोव्हर येथें गुप्तरीतीनें तह केला. या तहान्वयें चार्लस राजास लुईनें पैशाची बरीच मोठी रक्कम दिली असून डच लोकां- विरुद्ध युद्ध झाल्यास इंग्लंडने फ्रान्सला मदत करावी असें चार्लसकडून -कबूल करून घेतलें. चार्लसनेंही आपल्या राष्ट्रांमध्यें रोमन कॅथलीक पंथ प्रस्थापित करण्याच्या कामी कांहीं अडथळे आले तर फ्रान्सनें आप- स मदत करावी असे १४ व्या लुईकडून वचन घेतलें होतें. अशाप्रकारें इंग्लंडचें साहाय्य घेऊन १४ व्या लुईनें १६७२ मध्ये डच लोकांविरुद्ध युद्ध पुकारलें. इकडे चार्लसनें, आपण यावेळींच रोमन कॅथलीक पंथाचे अनुयायी आहोत असे जाहीर केल्यास लोकांमध्ये खळ- 'बळ उडेल असें वाटून, तूर्त ' सर्व लोकांना आपापल्या धर्मपंथाप्रमाणें बाग- ण्याची मुभा असावी ' असें जाहीर केलें. परंतु चार्लसचें धार्मिक बाबी - संबंधाचे वरील धोरण प्रतिगामी धोरणाच्या पार्लमेंटला न आवडून पार्ल- मेंटकडून या धोरणास विरोध करण्यांत आला. आपल्या प्रजेकडूनच आपणास या बाबतींत विरोध होत आहे हैं पहातांच चार्लसनें धार्मिक सवलती काढून घेतल्या; व यानंतर डच लोकांशी युद्ध करण्यांत कांहींच तात्पर्य नाहीं हें पाहून १६७४ मध्ये त्यांच्याशी तह केला. डच लोकांशी सुरू असलेल्या युद्धांतून इंग्लंडने आपले अंग काढून घेतल्यामुळे, डच लोकांना १४ व्या ईशी टक्कर देण्यास बरीच हिंमत आली; व सरते शेवटीं डच लोकांचा सेनापति ऑरेंजचा सरदार बुइल्यम यांच्या चिकाटीनें