पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण प्रेरणेनें चार्लसनें फ्रान्सशीं स्नेहसंबंध करून हॉलंडसारख्या चिमुकल्या प्रॉटेस्टंट पंथीय राष्ट्राचा मोड करण्याचा निश्चय केला. क्रॉमवेलनें आपल्या कारकीर्दीत 'इंग्लिश वसाहतींकडे बाहेरून जाणारा माल इंग्लिश जहाजांतूनच जावा' अशा प्रकारचा निर्बंध घातल्यामुळें (१६५१),त्यावेळेपासूनच इंग्लंड व हॉलंड यांच्यामध्यें व्यापारविषयक स्पर्धा उत्पन्न झाली होती ! क्रॉमवेलच्या कारकीर्दीत जरी डच लोकांचा परा- भव झाला होता, तरी या दोन राष्ट्रांमधील व्यापारविषयक स्पर्धा कमी झाली नसून, २ ऱ्या चार्लसनें आपला नाश करण्यासाठीं फ्रान्सशीं सख्य संपादन केलें आहे, हें पाहतांच हॉलंडने इंग्लंडशीं युद्ध जाहीर केलें ( १६६४ ). हें युद्ध तीन वर्षे - पर्यंत चालल्यावर, कोणतेंच राष्ट्र हार जात नाहीं हें पाहून तह करण्यांत आला. या तहान्वयें इंग्लंडनें क्रॉमवेलनें कलेल्या कायद्यांत थोडासा बदल केला व त्याबद्दल इंग्लंडला डच लोकांकडून - अमेरिकेतील न्यू अमस्टडीम हैं ठिकाण मिळालें; व यासच तदनंतर न्यूआर्क हें नांव देण्यांत आलें. हॉलंडशी युद्ध. १६६४-१६६७. तत्कालीन इतर युरोपियन राष्ट्रांकडे लक्ष दिल्यास १४ व्या लुईच्या अमदानीत फ्रान्सचा उत्कर्ष होऊन फ्रान्सचा दरारा सर्वत्र बसत चालला होता असे आपणास दिसून येईल. आपल्या सभोवतालची बारकीं राष्ट्रं पादाक्रांत करून सर्व युरोपभर आपले वर्चस्व प्रस्थापित करावें अशी १४ व्या लुईची महत्त्वाकांक्षा होती. तेव्हां अशारीतीनें फ्रान्सच्या अम- यदि महत्त्वाकांक्षेपासून इंग्लंडला पुढेमागें धोका येण्याचा संभव असल्या- मुळे फ्रान्सची सत्ता थोपवून धरण्याच्या कामीं जर इंग्लंडने इतर बारक्या राष्ट्रांस मदत केली असती तर तें युक्तच झालें असतें ! परंतु या वेळीं इंग्लं- डच्या गादीवर दुसऱ्या चार्लससारखा ऐषआरामांत व ख्यालीखुशालींत वेळ घालवणारा राजा असल्यामुळे त्यास वेळो- वेळ| पैसे चारून इंग्लंडचें मित्रत्व संपादन करण्याचे निदान त्यास तटस्थ- २. रा चार्लस. १४ बा 1 2