पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ लें. ] विषय-प्रवेश. ११ च्या अडाणी भाषांस 'भाषा' हें नांव देणें देखील चमत्कारिकच वाटलें असतें. परंतु आतां मध्ययुगाच्या आरंभी ही स्थिति पार पालटून गेली होती. या वेळीं ग्रीक व लॅटीन भाषा मृतप्राय झाल्या असून, त्यांचा जुन्याचे अभिमानी अशा विद्वान पंडितांकडून ग्रंथलेखनाच्या कामींच काय तो क्वचित् उपयोग होत असे; परंतु इकडे रानटी टोळ्यांच्या एका काळी अडाणी व क्षुद्र भासणाऱ्या भाषा सुसंस्कृत व संपन्न झालेल्या असून या भाषांचाच प्रसार सर्वत्र होत होता. भाषेपेक्षां लोकांच्या धार्मिक समजुतींत तर विलक्षण क्रान्ति घडून आलेली दिसून येईल. मध्ययुगाच्या प्रारंभी सर्व युरोपभर मूर्तिपूजक धर्मच प्रचलित असल्यानें ख्रिश्चन धर्माचा अनुयायी एखाददुसराच दिसा- वयाचा. परंतु अर्वाचीनयुगाच्या सुरुवातीस पूर्वेकडे आटोमन टर्क्सच्या अमलाखालीं असलेल्या थोड्या प्रदेशाखेरीज सर्व युरोपवर ख्रिश्चन धर्माचा पूर्ण पगडा बसला होता. तेव्हां सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपियन राष्ट्रांस निराळेंच वळण लागून सामाजिक, धार्मिक व राजकीय बाबतींत जी क्रान्ति झालेली दिसून येते, ती क्रान्ति होण्यास कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या व त्या वेळीं युरोपियन राष्ट्रांची परिस्थिति कशा प्रकारची होती याकडे लक्ष दिल्याखेरीज युरोपचा अर्वाचीन इतिहास समजण्यास मदत होणार नाहीं, म्हणून त्याबद्दल थोडेसें दिग्दर्शन करण्याचें योजलें आहे. मध्ययुगाच्या शेवटी शेवटीं ग्रीक व रोमन लोकांच्या वेळच्या प्राचीन कलाविद्यांचें पुनरुज्जीवन होऊन त्यांकडे युरोपियन जनतेचें लक्ष लागूं लागलें. त्यांच्या आचारविचारांत या नवीन प्रेरणेनें कान्ति घडून आली. इतके दिवस वरच्या व श्रीमान् वर्गाच्याच आटोक्यांत असलेले ज्ञानभांडार प्राचीन कलावि- यांचें पुनरुज्जीवन. सामान्य जनतेच्या आटोक्यांत येऊं लागलें; व या वेळी छापण्याच्या कलेचा शोध लागल्यानें तर या बाबतींत बरीच मदत झाली. प्राचीन कलाविद्यांचें पुनरुज्जविन होत असतां नवे नवे शोध लागून सामान्य प्रतीच्या व खालच्या वर्गाच्या लोकांस पुढे येण्याची संधि मिळाली.