पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वें . ] सतराव्या शतकांतील इंग्लंड. १३५ वैभव सर्वत्र वाढण्यास मदतच झाली ! आपल्या राष्ट्रांतील रोमन कॅथ- लकि, प्युरीडन, एपिस्कोपेलियन, प्रेसबिटेरियन वगैरे जे धार्मिक पंथ होत, - त्यांना धार्मिक बाबतींत पूर्ण मुभा असावी असें क्रॉमवेलला वाटत होतें, परंतु त्यावेळच्या इतर गृहस्थांच्या दुराग्रहावरून त्यास या बाबतींत कांहींच करतां आलें नाहीं. अंतस्थ बाबीसंबंधानें सर्वत्र स्वस्थता व संतुष्टता राखण्यासाठी क्रॉमवेलला कांहीं करतां आलें नाहीं, तरी परराष्ट्रीय राजकारणांत त्यानें इंग्लंडचा दरारा सर्वत्र बसविला. आपल्या राष्ट्राची व्यापारविषयक उन्नति व्हावी, व त्यास इतर राष्ट्रांच्या चढाओढीपासून धोका पोहचूं • नये या हेतूनें क्रॉमवेलनें अमेरिका खंडांत असलेल्या इंग्लिश वसाहतीं- • मध्यें जाणारा माल फक्त इंग्लिश जहाजांतूनच गेला पाहिजे असा निर्बंध घातला व त्यासच नॅव्हिगेशन कायदा असें म्हणत (१६५१). इतके दिवस ( - युरोपमधील निरनिराळ्या राष्ट्रांचा माल आपल्या जहाजांतून ठिकठिकाणीं रवाना करण्यामध्यें हॉलंडने आपला फायदा करून घेतला होता; परंतु क्रॉमवेलच्या वरील कायद्यानें हॉलंडचें फारच नुकसान होऊं लागल्यामुळे, हॉलंडने १६५२ मध्ये इंग्लंडविरुद्ध युद्ध जाहीर केलें. परंतु या -युद्धामध्यें हॉलंडचा पराभव होऊन त्यास तह करणें भाग पडलें ( १६५४ ). यानंतर क्रॉमवेलने स्पेनविरुद्ध फ्रान्सशी तह करून वेस्टइंडिज बेटां- पैकीं जमेका नांवाचें बेट व नेदर्लंडमधील डनकर्क नांवाचें ठिकाण जिंकून घेतलें. अशाप्रकारें क्रॉमवेलने इंग्लंडचे वैभव व दरारा सर्वत्र `पसरून, व्यापारविषयक बाबींत इंग्लंडने आपली जी उन्नती करून घेतली तिचा पायाच घातला असें म्हणण्यास हरकत नाहीं. क्रॉमवेलच्या मृत्यूनंतर ( १६५८ ) एक वर्षभर इंग्लंडमध्यें सर्वत्र बेबंदशाहीच माजून राहिली होती. पहिल्या प्रथम क्रॉमवेलचा मुलगा रिचर्ड क्रॉमवेल यास 'राष्ट्ररक्षक' असा किताब देऊन त्यास राज्य कारभारा-